नागपूर - कडक निर्बंधांच्या नावावर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने व्यापारी रस्त्यावर उतरले आहे. यातच नागपुरात भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने हातात फलक घेऊन व्यापारी वर्गा सोबत उभे राहून आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी आमदार गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. इतवारी परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जामवबंदीचे सर्रास उल्लंघन होताना दिसून आले.
यावेळी सुरुवातीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा दोन दिवसांचा विकेंड लाकडाऊन करण्यात येणार असल्याने याला होकार दिला होता. पण, प्रत्यक्षात ही कडक निर्बंध म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यांचा फटका लहान व्यापारी वर्गाला बसला आहे. यामुळे व्यापारी संतप्त झाले आहे.
यामुळे भाजपचे आमदार गिरीश व्यास यांनी लॉकडाऊनवर भाजपची भूमिका स्पष्ट करतांना एकीकडे कन्स्ट्रक्शन साईट, निर्माण कंपन्या सुरू आहे. काही व्यापार सुरू राहील मग बाकी दुकाने बंद का, असा सवाल केला. करायचे असल्यास पूर्ण बंद करा. अन्यथा ऑड-इव्हन पद्धतीचा अवलंब करा जेणेकरून एक दिवस एका बाजारपेठ दुसऱ्या दिवशी दुसरी बाजारोपेठ सुरू ठेवता येईल व बाजारात गर्दी होणार नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
...अन्यथा आंदोलन करू
यात नेहमी व्यापारीच का दिसतो त्यांचेच दुकाने का बंद केले जातात असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे ऑनलाइन कंपन्यांना परवानगी देण्यात आली असताना छोट्या लोकांच्या रोजगारावर गदा आली आहे. यामुळे या सर्व बाबीचा विचार करा अन्यथा उद्यापासून आंदोलनांना उतरू, असा इशारा भापजा व्यापारी आघाडीचे विनय जैन यांनी सांगितले आहे.
यावेळी पोलिसांनी मात्र जमाबंदी कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी बंदोबस्त लावून व्यापारी वर्गांना एकत्र येऊ नये असे सांगत जामवबंदी आदेशाची पायमल्ली केल्यास कारवाई केली जाईल, अशा सूचना दिल्याने आंदोलांकानी गर्दी कमी केली.
हेही वाचा - व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी संदर्भात समाजात संभ्रमाची स्थिती, परिवहन कार्यालयाकडे माहितीचा अभाव