ETV Bharat / state

बनावट ओळखपत्राद्वारे १३१ रेल्वे तिकीटांची विक्री; ४ आरोपी अटकेत - train

या कारवाईमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आला आहे. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असून काही दलाल भूमिगत झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ आरोपी हे कामठी मधील असून  १ आरोपी पारशिवणी येथील आहे.

नागपूर रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेले आरोपी
author img

By

Published : May 4, 2019, 9:56 AM IST

नागपूर - रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर धाड टाकून व चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या वेगवेगळ्या केंद्राची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे ४२ बनावट ओळखपत्रे, ऑनलाइन व ऑफलाईन असे दोन लाख ३७ हजार रुपये किमतीचे १३१ रेल्वे तिकीट जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई गुरुवारी कामठी मार्गावरील लुंबिनी नगर येथे करण्यात आली आहे.

पोलीस अधिकारी कारवाईविषयी सांगताना

या कारवाईमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आला आहे. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असून काही दलाल भूमिगत झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ आरोपी हे कामठी मधील असून १ आरोपी पारशिवणी येथील आहे. विशेष म्हणजे उन्हाळाच्या सुट्ट्या असल्याने प्रवाशांची या दिवसात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तिकीटांचा काळा व्यवसाय येथून सुरू होतो. प्रवाशांकडून रेल्वे तिकीटामध्ये अधिक पैसे आकारून तिकीटची विक्री करन्यात येते.

आरोपी विजय टेम्बुरने हा लुम्बीनी या परिसरातून अवैध तिकीट विक्री करीत होता. विशेष म्हणजे त्याच्याकडे आयआरटीसी परवाना नसताना सुद्धा तो तिकीट काढून द्यायचा. यामुळे प्रवासी तिकिट काढून घेण्यासाठी त्याच्याकडे येत होते. आयटी विभागाला याबाबत माहिती मिळाली व त्यांना वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या संपूर्ण कारवाई मध्ये ४ आरोपींकडून २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

Intro:नागपूर रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर धाड घातली. व चार आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्या वेगवेगळ्या केंद्राचे झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे ४२ बनावट ओळखपत्रे व त्याच्याकडून ऑनलाइन व ऑफलाईन असे दोन लाख ३७ हजार रुपये किमतीच्या १३१ रेल्वे तिकीट जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी कामठी मार्गावरील लुंबिनी नगर येथे करण्यात आली आहे.

Body: या कारवाईमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आला आहे. आणि काळाबाजार करण्याऱ्यामध्ये धडकी भरली असून काही दलाल भूमिगत झाले आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ आरोपी हे कामठी मधील असून तर १ आरोपी पारशिवणी येथील आहे. विशेष म्हणजे उन्हाळाच्या सुट्ट्या असल्याने प्रवासाची ह्या दिवसात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तिकीटांचा काळा व्यवसाय इथून सुरू होतो. प्रवाशांकडून रेल्वे तिकीट मध्ये अधिक पैसे आकारून तिकीटची विक्री करन्यात येते.

Conclusion:या आरोपींमध्ये विजय टेम्बुरने हा लुम्बीनी या परिसरातून अवैध तिकीट विक्री करीत होता विशेष म्हणजे त्याच्याकडे आयआरटीसी परवाना नसताना सुद्धा त तिकीट काढून द्यायचा यामुळे प्रवासी तिकिट काढून घेण्यासाठी त्याच्याकडे येत होते. आयटी विभागाला याबाबत माहिती मिळाली व त्यांनी वरिष्ठांना सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.ह्या संपूर्ण कारवाई मध्ये ४ आरोपींकडून कारवाई मध्ये २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

कृपया नोंद घ्यावी वरील बातमीचे visuals रिपोर्टर अँप ने पाठविले आहे त्याचा slug खालीलप्रमाणे
R_MH_Nagpur_May3_RPF_Visuals_Sarang
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.