नागपूर: पोलिसांच्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात राहणारे एक कुटुंब 20 तारखेला देव-दर्शनासाठी पंढरपूरला गेले होते. 23 तारखेला ये कुटुंब घरी परत आल्यानंतर घराचे दार उघडे दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त दिसून आले, त्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान एक कागद त्यांच्या नजरेस पडला त्यावर लिहिलेला मजकूर वाचून त्या कुटुंबाला धक्काच बसला, लिहिलेल्या मजकुरावर हसावे की रडावे अशी अवस्था त्यांची झाली होती.
मी काहीही चोरेलं नाही, भिकारी'
चोराने मोठ्या मेहनतीने चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश मिळवला होता, मात्र घरात तीन हजार रुपयां शिवाय काहीही न सापडल्याने चिडलेल्या चोराने एका कागदावर 'मी घरातील काहीही चोरेलेलं नाही भिकारी' असे लिहून पोबारा केला आहे. त्या कुटुंबाच्या तक्रारींवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.