ETV Bharat / state

HIV Blood Infection : रक्तातून एचआयव्ही संक्रमणाचा धोका कसा होतो? काय आहेत तांत्रिक बाबी जाणून घेऊ या विशेष रिपोर्टमध्ये...

नागपुरात दूषित रक्त दिल्यामुळे चार लहान बालकांना एचआयव्हीचे संक्रमण ( HIV infection ) झाल्याचे समोर आले आहे. यासाठी रक्त देताना डोनर आणि रक्त संकलन केंद्राची काय एसओपी असते, तसेच त्यातील तांत्रिक बाबी ज्यामध्ये चाचणी केलेले ब्लड का दूषित ठरले, ते ही जाणून घेऊ....

NAT
NAT
author img

By

Published : May 26, 2022, 10:37 PM IST

नागपूर: थॅलेसेमियाच्या रुग्णांना ( Thalassemia patients ) नियमित रक्त द्यावे लागते, त्यांच्या शरीरात रक्त तयार होत नसल्याने त्यांचं आयुष्य हे बाहेरच्या रक्तदात्यांवर अवलंबून असते. पण थॅलेसेमिया रुग्णांना रक्त देताना इतर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण नागपुरात दूषित रक्त दिल्यामुळे चार लहान बालकांना एचआयव्हीचे संक्रमण झाल्याचे समोर ( HIV infection in the blood ) आले आहे. यासाठी रक्त देताना डोनर आणि रक्त संकलन केंद्राची काय एसओपी असते, तसेच त्यातील तांत्रिक बाबी ज्यामध्ये चाचणी केलेले ब्लड का दूषित ठरले, ते ही जाणून घेऊ....

रक्तदात्यांकडून मिळालेल्या ब्लडवर नियमित पद्धतीने ब्लड बँकेत चाचण्या केल्या जात असतात. रेग्युलर दोन किंवा तीन युनिट ब्लड दर महिन्याला थॅलसेमिया रुग्णांना लागते. त्यामुळे ब्लड डोनरची गरज असते. थॅलेसेमिया आजार असल्यास शरीरात हिमोग्लोबिन बनत नसल्याने बाहेरून रक्त देऊनच आजार झाल्यापासून आयुष्यभर दुसऱ्याच्या रक्तावर जगावे लागते. पण हे ब्लड 2016 पासून मोफत देण्यात यावे, असा सूचना आहेत. त्यामुळे थॅलेसेमियाच्या रुग्णांना विना विषाणू संक्रमित किंवा शुद्ध ब्लड कसे मिळेल हे प्रमुख आवाहन आहे. यासाठीच ब्लड बँकेकडे रक्तदाते हे नियमित रक्त देणारे असावे, तसेच स्वेछिक रक्तदाते असावेत अस बोलले जाते. कारण नियमित रक्तदाते असल्यास त्या ब्लड बँकेला पूर्वी केलेल्या चाचण्या यासह त्या डोनरसचा शारिरीक प्रकृतीचा डेटा असतो. त्यामुळे फायद्याचे आणि सोपी ठरते.

रक्तातून एचआयव्ही संक्रमणाचा धोका कसा होतो

कोणत्या रक्त चाचण्या कोणत्या टेक्नॉलॉजीने करणे बंधनकारक आहे?

भारत सरकारने थॅलेसेमिया किंवा रक्तदात्याचे रक्त देण्यासाठी पाच टेस्ट बंधनकारक केल्या आहेत. यात प्रामुख्याने एचआयव्ही, हिपॅटायटीस बी आणि हिपॅटायटिस सी, सीफिलिंफ आणि मलेरिया पॅरासाईट या टेस्ट बंधनकारक केल्या आहेत. या चाचण्या करण्यासाठी रक्त विषाणू संक्रमित, तर नाही ना हे तपासण्यासाठी तीन टेक्नॉलॉजी वापरल्या जातात. यातील पहिली म्हणजे एलायझा या टेक्नॉलॉजीने ब्लड आले त्या दिवशी जरी चाचणी केली, तर त्या रक्तदात्याला चार आठवड्यापूर्वी जे संक्रम झाले आहे, ते समजते. पण या चार आठवड्या पेक्षा कमी कालावधी मधील कुठल्याही विषाणूचा संक्रमण या तपासणीत समोर येत नाही. यालाच वैदकीय भाषेत 'विंडो पिरेड' असे म्हणतात. यात एलयझा टेक्नॉलॉजी ही सर्वात जास्त विंडो पिरेड आहे. यात न्यूक्लिक ऍसिड टेस्टिंग (NAT) टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चाचणीत 10 ते 12 दिवस अगोदर जरी संक्रमण झाले असले, तरी या चाचणी दरम्यान समोर येते. त्यामुळे दूषित रक्त ब्लडडोनर कडून मिळाल्यास वेळीच कळू शकेल, शिवाय ते दूषित रक्त कोणाला पुरवठा केला जाणार नाही.

नॅटटेस्ट रक्त चाचणीचा खर्च -

एलयाजा टेक्नॉलॉजीमध्ये विषाणू संक्रमण चाचणी अहवाल येण्यासाठी साधारण पाच तासाचा कालावधी लागतो. दुसऱ्या टेक्नॉलॉजीने अर्धा तास लागतो. तेच यात नॅट (NAT) टेस्ट ब्लड टेक्नॉंलॉजीने तपासणीला पाच तास लागते. पण नॅटटेस्ट ( NAT ) ही अद्यावत चाचणी असल्याने तिची मागणी सध्या एचआयव्ही संक्रमण शोधण्यास अधिक गतीशीर ठरत असल्याचेही बोलले जाते. यात नॅटटेस्ट मोजक्याच ब्लडबँकमध्ये उपलब्ध आहे. नागपुरात 14 मोठ्या रक्तपेढ्या असल्या, तरी प्राथमिक माहिती नुसार केवळ दोन ते सध्या ब्लड बँककडे नॅटटेस्ट ब्लड मिळते. पण यासाठी शासकीय मदत नसल्याने यासाठी जवळपास 1200 रुपये अधिकच खर्च असतो. यात शासनाकडून नॅटटेस्टचा खर्च उचलल्यास यात संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे मोफत ब्लड देतांना हे नॅटटेस्ट ब्लड गरीब पालकांना दिल्यास मोठी मदत होऊ शकेल. कारण एक युनिट ब्लडला 1200 या प्रमाणे नॅटटेस्टसाठी महिन्याला 4 हजाराचा खर्च हा केवळ तपासणीसाठी लागेल.

मोफत नॅटटेस्ट ब्लड देण्याची मागणी -

नागपूर जिल्ह्यात 1 हजार पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. शासकीय ब्लड बँकेत कुठेही नॅटटेस्ट ब्लड मिळत नाही. त्यामुळे बाहेरून हे नॅटटेस्ट ब्लड हे सामान्य कुटुंबातील रुगांना परवडत नाही. त्यामुळे सर्वाना मोफत नॅटटेस्ट ब्लड द्यावे, अशी मागणी थॅलेसिमिया रुग्णांसाठी काम करणाऱ्या सेवा फाऊंडेशन संस्थेचे राज खंडारे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली आहे.

या बालकांना एचआयव्हीची लागण होण्यामागे काय कारण -

यात चार आठवड्यानंतर चाचणीत समोर येतो. त्यामुळे यात शंका आहे मशीन टेक्नॉलॉजीला मर्यादा आहे. ते त्या त्या मशीनवर अवलंबून असते. यामुळे ज्या ब्लड बँकेतून हे ब्लड दिले ते नॅटटेस्टन नसण्याची शक्यता अधिक आहे. यात मोफत ब्लड मिळाले असले त्यामुळे मागील पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून ब्लड घेत असल्याने आजपर्यंत लागण झाली नाही. मात्र शेवटी एप्रिल महिन्यात त्याच ब्लड बँकेतील रक्त संक्रमित असल्याने त्या सहा वर्षाच्या बालकाला थॅलॅसिमिया सोबत एचआयव्हीचे संक्रमण दूषित रक्ताने झाले आहे. त्यामुळेच एचआव्हीचे संक्रमण थांबवण्यासाठी नॅटटेस्ट ब्लड मिळावे अशीच मागणी केली आहे. कदाचीत नॅटटेस्ट ब्लड त्या चार चिमुकल्यांना मिळाले असते, तर ही वेळ आली नसती.

हेही वाचा - दुषित रक्ताने घेतला एका चिमुकल्याचा जीव, एचआयव्ही बाधित मुलाच्या पित्याने सरकारकडे केली 'ही' मागणी...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.