नागपूर - शासकीय वसतिगृहात अतिशय कमी दर्जाचे जेवण आणि नाश्ता दिल्यामुळे दीक्षाभूमीजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मेसमधील ठेकेदार बदलला जाणार नाही, तोपर्यंत जेवण करणारच नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
हेही वाचा - 'गृह खाते राष्ट्रवादीला मिळाल्यास महिलांवरील अत्याचारास आळा घालू'
गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना दिला जाणारा नाश्ता आणि जेवणाचे प्रमाण ठेकेदार कमी करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह समाज कल्याण विभागाच्या अधिपत्याखाली येत असून या वसतिगृहात एकूण 150 विद्यार्थी राहतात. 150 विद्यार्थ्यांसाठी केवळ 12 लिटर दूध मागवले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना दिले जात असलेल्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाणच जास्त असल्याचे देखील तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
हेही वाचा - प्रजनन वाढीसाठी नागपूरचा 'सुलतान' मुंबईला रवाना
जेवणाची गुणवत्ता देखील अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिमाण होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या संदर्भात समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन देखील कोणतेच पाऊले उचलण्यात आले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अन्नत्याग आंदोलन सुरू करावे लागले.