ETV Bharat / state

'हनीट्रॅप' प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल सय्यदच्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेचा हातोडा

कथित हनी ट्रॅप प्रकरणाचा मुख्य आरोपी साहिल सय्यदचं याच्या मानकापूर परिसरातील बंगला पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागपूर महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या साहिल सय्यदचा हा आलिशान बंगला पाडण्याचे काम सुरू केले असून उद्यापर्यंत हा बंगला जमीनदोस्त केला जाणार आहे.

'हनीट्रॅप' प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल सय्यद

author img

By

Published : Aug 12, 2020, 7:39 PM IST

नागपूर : येथे गाजलेल्या कथित हनीट्रॅप प्रकरणासह काही इतर गंभीर गुन्ह्यांत अडकलेला विविध पक्षाचा तथाकथित नेता साहिल सैय्यद याच्या मानकापूर परिसरातील बंगल्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. साहिल सय्यद याचा अनधिकृत बंगला पाडायला मनपाने सुरुवात केली असून, उद्यापर्यंत हा बंगला जमीनदोस्त केला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे याआधी सुद्धा नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या बंगल्यावर अशीच कारवाई करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी नागपूरच्या भाजप नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवा अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यातील एक आवाज साहिल सय्यदचा असल्याचं पोलीस तपासात समोर आले होते. नागपुरातील भाजप नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्न झाल्याचे प्रकरण राज्यभरात गाजलं आहे. या प्रकरणात साहिल सय्यद याचे नाव पुढे आल्यानंतर भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. साहिल सय्यदचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर तो नेमका कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता हा देखील प्रश्न उपस्थित झाला होता.

राजकीय नेत्यांशी जवळीक साधून साहिल सय्यद आपले काळे धंदे करत असल्याचेदेखील पुढे आल्यानंतर त्याने मानकापूर परिसरातील बाबा फरीद नगरमधील जागेवर अवैध कब्जा करून त्या ठिकाणी आलिशान बंगला बनविला असल्याची माहिती पुढे आली होती. यानंतर, महापालिकेने त्याच्या बंगला तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. गेल्या महिन्यात गुन्हे शाखा पोलिसांनी साहिलच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्या काळ्या कारनाम्यांची यादी पुढे यायला लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.