नागपूर - गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. काटोल तालुक्यातील मेंटपांजरा येथून सलील देशमुख मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा - धुळे जिल्हा परिषद निवडणूक : भाजप १८, तर महाविकास आघाडी ४ जागांवर विजयी
निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचे तोंड बघावे लागले आहे, तर अनेकांनी अनपेक्षितरित्या विजयाचा झेंडा फडकवला आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वात हाय-प्रोफाइल निवडणूक म्हणून गृहमंत्र्यांचे चिरंजीव सलील देशमुख लढवत असलेल्या निवडणुकीकडे बघितले जात होते. सलील देशमुख यांनी मेटपांजरा येथून भाजप उमेदवार प्रवीण अडकीने यांचा सुमारे साडेचार हजार मतांनी पराभव केला.
विजयी झाल्यावर सलील देशमुख यांची काटोल शहरातून विजयी यात्रा काढण्यात आली. सलील देशमुख हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. वडील गृहमंत्री व पाच वेळा आमदार असल्याने राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.
हेही वाचा - बोगस पदवी प्रकरण : मंत्री उदय सामंत यांची विनोद तावडेंकडून पाठराखण