नागपूर - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाले आहे. अनिल देशमुख यांनी स्वतः चितारओळी येथे जाऊन बाप्पाची मूर्ती घरी आणली. त्यानंतर संपूर्ण देशमुख कुटुंबियांनी भक्तीभावाने बाप्पाला स्थानापन्न केले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी अनेक पिढ्यांपासून बाप्पाची सेवा केली जात आहे. ते स्वःता कुटुंबासमवेत गणपती बाप्पाला घरी घेऊन येतात. गृहमंत्री असतानाही त्यांनी ही परंपरा जपली. राज्यावर ओढवलेल्या कोरोनाच्या महामारीच्या संकटातून लवकर मुक्तता व्हावी, अशी मागणी त्यांनी बाप्पाकडे केली आहे.