नागपूर- हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेवर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांकडे रुग्णालय प्रशासनाने खर्चाची मागणी केल्याची चर्चा जोर धरत आहे. हाच धागा पकडून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचे खंडन करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने आपले स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही उपचार सुरू केल्यापासून सरकारी मदतीची वाट बघितली नाही. एवढंच काय तर आम्ही पीडितेच्या कुटुंबाकडेही याची मागणी केली नाही. असे डॉ. अनुप मरार यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणवरून उच्च शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरुंना झापले !