ETV Bharat / state

'रेमडेसिव्हिर औषधांच्या वापराबाबत लवकरच टास्कफोर्स नेमणार, गैरवापर होऊ देणार नाही' - कोरोना अपडेट्स नागपूर बातमी

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सध्या नागपूर विभागाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी रेमडेसिव्हिर औषधांच्या वापराबाबत टास्कफोर्स नेमण्यासह यातील गैरवापर थांबविण्याचे निर्देश दिले असून तशी अधिकाऱ्यांना ताकीद दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

author img

By

Published : Sep 25, 2020, 6:32 PM IST

नागपूर - राज्यात रेमडेसिव्हिर औषधांबाबत तक्रारी वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर औषधांच्या वापराबाबत टास्कफोर्स नेमण्यासह यातील गैरवापर थांबविण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. अवैध बाबींनाही आळा घातल्या जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, राज्यातील सर्वच डॉक्टरांनी कोविड रुग्णालयात काम करतांना एक दिवसाआड सेवा द्यावी जेणेकरून उपचारात दिरंगाई होणार नाही, असेही ते म्हणाले. नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून विविध शहरांचा आढावा घेतला जात आहे. सध्या टोपे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रेमडेसिव्हिर औषधांत होणारा काळाबाजार, रुग्णालयांत होणाऱ्या गैरवापराबाबत बोलतांना सांगितले. रेमडेसिव्हिरमुळे रुग्णाचा जीव वाचेल असे नाही तर त्याचा वापर टेस्टिंगनंतरच करावा जेणेकरून औषधाचा गैरवापर होणार नाही आणि अशा प्रकारांना आळा घालता येईल. शिवाय या औषधीबाबत होणाऱ्या काळाबाजारावर लक्ष देऊन अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे निर्देशही यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले आहे. नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी कोरोना रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सात दिवसाची रजा न घेता एक दिवसाआड सेवा द्यावी जेणेकरून रुग्णांच्या उपचारात दिरंगाई होणार नाही, असे निर्देशही यावेळी दिले.

आज आरोग्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला, नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालाही भेट दिली. त्यानंतर त्यांनी सद्यस्थितीचा आढावा घेत टेस्टिंग, रुग्णांसाठी खाटा वाढविण्याबाबतचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शिवाय रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करा, वेळीच खाटादेखील उपलब्ध करून द्या असे आवाहनही टोपे यांनी प्रशासनाला केले आहे. सध्या शहरातील शासकीय रुग्णालयात कोविड खाटांचे प्रमाण कमी आहे. त्यात वाढ करून ती १ हजार खाटांपर्यत करावी, ज्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना खाटांचा अभाव भासणार नाही. शिवाय खाटांबाबत तक्रारी येणार नाही, असे निर्देशही दिल्याचे यावेळी ते म्हणाले. शिवाय कोणत्याही खासगी रुग्णालयांनी अधिकचे पैसे आकारणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. त्याचबरोबर प्लाझ्मा दरदेखील शासनाने ठरविल्याप्रमाणेच आकारण्यात यावा, अशा सूचनाही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. एकंदरीत रुग्णांच्या तक्रारीचे निराकरण प्रशासनाने वेळीच करावे, असेही ते म्हणाले.

यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन साठ्याबाबत माध्यमांशी संवाद साधला. जिल्ह्याला आवश्यक तेवढा साठा सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे सद्यस्थिती लक्षात घेता अधिकच्या साठ्याची सध्यातरी गरज नसल्याचे शिंगणे यांनी सांगितले. त्याचबरोबर रेमडेसिव्हिर औषधांचा वापर रुग्णालयांनी जपून करावा. गरज असेल तरच त्यांचा वापर करावा, असे निर्देश दिल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. सद्यस्थिती पाहता शासनाकडून पूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचेही यावेळी शिंगणे म्हणाले.

हेही वाचा - नागपुरात आता ५३वे नवे कोविड रुग्णालय; नागरिकांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेकडून व्यवस्था

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.