ETV Bharat / state

विदर्भात कोरोना आऊट ऑफ कंट्रोल; आरोग्य मंत्र्यांसह तीन मंत्री घेणार आढावा

नागपुरात कोरोनाच्या बाबतीत दुर्लक्ष झालेले नाही.आम्ही लक्ष ठेऊन आहोत. दर आठवड्याला आढावा घेत आहे. मला वाटते कोरोना रुग्ण वाढले तर ते टेस्टिंग वाढवल्याने वाढतात. पण मृत्यू वाढू नये, त्यासाठी ऑक्सिजन खाटा वाढवणे आवश्यक आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

विदर्भात कोरोना आऊट ऑफ कंट्रोल
विदर्भात कोरोना आऊट ऑफ कंट्रोल
author img

By

Published : Sep 24, 2020, 4:38 PM IST

नागपूर - विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्य सरकारने विदर्भाला वाऱ्यावर सोडल्याची ओरड सुरू झाल्यानंतर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख, धीरज देशमुख आज आणि उद्या विदर्भातील चार जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या सर्व जिल्ह्यात कोरोना रुग्ण तीव्रतेने वाढत आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणायचे आहे. काल पंतप्रधानांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा असून राज्यातील सर्व जिल्ह्यात ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवणे गरजेचे असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर आरटीपीसीआर टेस्ट वाढवणे गरजेचे आहे. अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह येऊन रुग्ण पुन्हा पॉसिटिव्ह येत आहे. रुग्णांनी होम क्वारंटाइनवर भर दिला पाहिजे. ज्यामुळे रुग्णालयांचा भार कमी होईल. जिथे कोरोना टेस्टिंग कमी झाली आहे तिथे आणखी प्रादुर्भाव होण्याची भीती आहे, त्यामुळे टेस्टिंग वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

पर मिलियन लोकसंख्येमागे कोरोना चाचणी जी राज्यात सरसरीने 40 हजार आहे किमान तेवढी झालीच पाहिजे. ज्या जिल्ह्यात ती 40 हजारांनी कमी आहे, तिथे वाढवलीच पाहिजे. एका रुग्णामागे अनेक जिल्ह्यात संशयित रुग्ण शोधणे होत नाही आहे, ते ही झाले पाहिजे. नागपुरात कोरोनाच्या बाबतीत दुर्लक्ष झालेले नाही.आम्ही लक्ष ठेऊन आहोत. दर आठवड्याला आढावा घेत आहे. मला वाटते कोरोना रुग्ण वाढले तर ते टेस्टिंग वाढवल्याने वाढतात. पण मृत्यू वाढू नये, त्यासाठी ऑक्सिजन खाटा वाढवणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयातील दराच्या बाबतीत कॅपिंग करण्यात आली आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेबद्दलही जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना अधिकार दिले आहेत. जर कोणी दर जास्त आकारत असेल तर 5 पट दंड लावले पाहिजे, परवाना रद्द केले पाहिजे. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना अधिकार दिलेले आहेत. ते दिलेल्या अधिकारांचे पालन करत नसतील तर त्यांना भाग पाडू असं देखील ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - नागपुरात बिअरबार लूटणाऱ्यांना अटक, पोलिसांनी आरोपींची काढली धिंड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.