ETV Bharat / state

सीताबर्डी बाजारात दुकाने थाटण्यात मनाई केल्याने संतप्त हॉकर्सकडून आंदोलन - nagpur hawkers news

नागपूर महानगर पालिका प्रशासनाकडून हॉकर्सला दुकानात लावण्यासाठी मनाई करण्यात आल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. सोशल डिस्टनसींच्या नियमांचे पालन करत हॉकर्सकडून आंदोलन केले जात आहे. सीताबर्डीच्या या बाजारात दररोज दोनशे ते तीनशे हॉकर्स आपले दुकान लावतात.

hawkers-agitations-for-banning-shops-in-sitabuldi-market-in-nagpur
सीताबर्डी बाजारात दुकाने थाटण्यात मनाई केल्याने संतप्त हॉकर्सकडून आंदोलन
author img

By

Published : Jun 4, 2021, 9:46 AM IST

नागपूर - राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने ब्रेक द चैन अंतर्गत लॉक-डाऊनच्या नियमात थोडी शिथिलता दिली आहे. या अंतर्गत स्थानिक प्रशासनाला नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानूसार आज नागपूर महानगरपालिकेने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या सीताबर्डी मार्केटमध्ये होत असलेली गर्दी लक्षात घेता हा हॉकर्सला दुकाने लावण्यास मनाई केली. यामुळे संतप्त झालेल्या हॉकर्सकडून भर रस्त्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुख्य मार्गावरच हॉकर्स ठिय्या आंदोलन केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे पोलिसांनी या भागात बॅरिकेटिंग करत वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवली.

सीताबर्डी बाजारात दुकाने थाटण्यात मनाई केल्याने संतप्त हॉकर्सकडून आंदोलन
प्रशासनासोबत चर्चा करण्याची हॉकर्सची मागणी

राज्यात एक जूनपासून ब्रेक द चैन अंतर्गत अनलॉकचे नवे नियम लागू झाले आहेत. या नियमाअंतर्गत सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिवनावश्यक वस्तूंसह अत्यावश्यक वस्तूंचे दुकान सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर छोट्या दुकानांना देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र नागपूर महानगरपालिका प्रशासनाने हॉकर्स आणि वेंडर्स यांना दुकान लावण्यास परवानगी नाकारल्यामुळे या दुकानदारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या हॉकर्सकडून प्रशासनासोबत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन

नागपूर महानगर पालिका प्रशासनाकडून हॉकर्सला दुकानात लावण्यासाठी मनाई करण्यात आल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत हॉकर्सकडून आंदोलन केले जात आहे. सीताबर्डीच्या या बाजारात दररोज दोनशे ते तीनशे हॉकर्स आपले दुकान लावतात.

हेही वाचा - 'अनलॉक' संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील - विजय वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.