ETV Bharat / state

भंडारा जळीत घटना : सर्वात उशिरा पोहचले पालकमंत्री विश्वजीत कदम - bhandara hospital fire news

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विश्वजीत कदम हे सर्वात आधी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, ते कालपासून सांगलीला असल्यामुळे ते सर्वात उशिरा पोहचले. याबाबत त्यांना विचारले असता, मी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेश दिले होते, असे ते म्हणाले.

guardian minister vishwajeet kadam arrived late in bhandara
भंडारा जळीत घटना : सर्वात उशिरा पोहचले पालकमंत्री विश्वजीत कदम
author img

By

Published : Jan 9, 2021, 5:32 PM IST

नागपूर - भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिशु कक्षात असलेल्या अतिदक्षता विभागाला आज मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु या घटनेला बारा तास झाल्यानंतर भंडारा येथे जाण्याकरिता पालकमंत्री विश्वजीत कदम नागपूर विमानतळावर दाखल झाले होते. तुम्हाला जायला उशिर का झाला, यासंदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता, ही घटना रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली आणि मला सकाळी ७ च्या सुमारास या संदर्भात माहिती मिळली, सकाळपासून मी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेश दिले होते, असे ते म्हणाले.

विश्वजीत कदम यांची प्रतिक्रिया

कदम हे सर्वात आधी पोहोचणे अपेक्षित होते -

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विश्वजीत कदम हे सर्वात आधी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, ते कालपासून सांगलीला असल्यामुळे त्यांना आज भंडारा येथे पोहोचण्यासाठी उशीर झाला. मात्र तोपर्यंत मृत्यू झालेल्या दहा चिमुकल्यांच्या कुटुंबियांना त्यांचे पार्थिव शरीर सोपवण्यात आले होते. काही ठिकाणी तर अंत्यसंस्काराची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली होती. भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली असली, तरी संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी या कठीण प्रसंगी या बालकांच्या आईवडिलांना धीर देणे अपेक्षित होते. पण दुर्दैवाने पालकमंत्री सर्वात शेवटी घटनास्थळी दाखल झाल्याने पीडित आई-वडिलांनी न्याय मागाचा तरी कुणाला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

मुखमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी सुद्धा पालकमंत्री गैरहजर -

काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली होती. त्यावेळीदेखील पालकमंत्री विश्वजीत कदम हे उपस्थित नव्हते. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहेत. मुख्यमंत्री दौरा आटोपून गेल्याच्या १२ तासातच जिल्हा सामान्य रुगणालयाच्या शिशु कक्षातील अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घडली. यावेळी पालकमंत्री जिल्ह्यात उपस्थित असते, तर उपाययोजना करण्यासंदर्भात आणखी प्रभावी नियोजन करता आले असते.

हेही वाचा - 'बालकांचे मृत्यू नाही तर हत्याच' ; याला सरकारच जबाबदार असल्याचा भाजपा नेत्यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.