नागपूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना २ लाखांची कर्जमाफी दिल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. कर्जमाफी कशी आणि कुणाची होईल या संदर्भात स्पष्टता नसल्याने शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी सरकारवर टीका केली आहे.
सरकारने दिलेली कर्जमाफी २ लाखापर्यंत आहे. पण, त्यांच्या जाहीरनाम्यात सातबारा कोरा करू, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नसल्याने 'खोदा पहाड निकाला चूहा' अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले आहेत. एवढंच काय तर, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत देऊ, अशी घोषणा केली होती. ती घोषणासुद्धा हवेत विरल्याचे माजी आमदार वामनराव चटप यांनी सांगितले.
हही वाचा- महानगरपालिकेत 'एक सदस्य एक वार्ड' सुधारणा विधेयक विधानपरिषदेत मंजूर, भाजपने केला होता विरोध