ETV Bharat / state

शालेय पोषण आहाराचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याचा शासनाचा निर्यय, शिक्षक समितीचा निर्णयाला विरोध - शालेय पोषण आहाराची बातमी काय आहे

उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता तो अनुदान स्वरूपात थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय पालकांना परवडणारा नसल्याने, या निर्णयाला पालक वर्गातून विरोध होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

जेवण करताना विद्यार्थी
जेवण करताना विद्यार्थी
author img

By

Published : Jun 30, 2021, 5:48 PM IST

Updated : Jun 30, 2021, 7:26 PM IST

नागपूर - उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता तो अनुदान स्वरूपात थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ दीडशे रुपयांच्या अनुदानासाठी विद्यार्थ्यांना हजार रुपयांचे बँक खाते उघडावे लागणार आहे. हा निर्णय पालकांना परवडणारा नसल्याने, या निर्णयाला पालक वर्गातून विरोध होऊ लागला आहे.

शालेय पोषण आहाराचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्याला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने विरोध केला आहे

'बँक खाते उघडणे परवडणारे नाही'

शालेय विद्यार्थ्यांना (२०२१)च्या उन्हाळी सुट्टीतील धान्य वाटपाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालयांकडून नुकतेच जारी करण्यात आले आहे. विविध शासकीय योजना व स्कॉलरशिप घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आहे. परंतु, हे प्रमाण फार अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाचा हा आदेश चुकीचा असल्याचे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

'दीड-दोनशे रुपयांसाठी हजार रुपायांचा खर्च'

उन्हाळी सुट्टीतील ३५ दिवसांचे अनुदान पाहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता १५६ रुपये आहे. तर, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २३४ रुपये ठरणार आहे. त्यामुळे किमान दीडशे रुपयांच्या निधीसाठी एक हजार रुपये भरून, बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे हा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

'९ जुलै पर्यंत बँक खाते उघडा'

केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, (२०१३ NFSA) अंतर्गत देशातील सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना दरमहा ५ किलो प्रति लाभार्थी अन्नधान्याचे वेगवेगळ्या योजनांद्वारे वितरण करण्याचे जाहीर केले आहे. केंद्र शासनाच्या मोफत धान्य देण्याच्या तरतुदीचा एक भाग म्हणून, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सन (२०२१)च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून, सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या आहार खर्चाच्या रकमे इतके आर्थिक साहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करण्याचे नियोजन केलेले आहे. केंद्र शासनाच्या उपरोक्त नियोजनाप्रमाणे या योजनेस पात्र सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील आहार खर्चाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

'संबंधितांना लेखी सूचना द्या'

शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंक, बॅक खाते माहिती खालील विहित नमुन्यात अद्ययावत करुन तयार ठेवण्यात यावी. तसेच, अद्याप ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यात आले नसेल, अशा विद्यार्थ्यांचे आधार लिंक बँक, खाते उघडण्याबाबत संबंधिताना आपल्या स्तरावरुन लेखी सूचना देण्यात याव्यात. तसेच, जिल्ह्यातील 'शापोआ' योजनेस पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे १०० % बँक खाते उघडण्यात यावेत. दिनांक (०९ जुलै , २०२१)पर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अद्ययावत करून, जिल्हास्तरावर जतन करण्यात यावी. बँक खाते उघडण्यासाठी शाळेने संबंधित पालकांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन सर्व शाळांना निर्गमित करण्यात यावेत असे आदेशही देण्यात आले आहेत.

Last Updated : Jun 30, 2021, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.