नागपूर Gold Smuggling : महसुल गुप्तचर संचालनालयानं (DRI) रेल्वेमार्गे सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. डीआरआयच्या पथकानं नागपूर रेल्वे स्थानकावरून (Nagpur Railway Station) 8 किलो 500 ग्रॅम गोल्ड बिस्कीटासह (Gold Biscuit) दोघांना अटक केली आहे. त्याचप्रमाणं देशभरात तीन ठिकाणी कारवाई करत तब्बल 19 कोटी रुपयांचे सोने जप्त केल्याची माहिती समजली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाकडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.
विदेशी सोन्याची तस्करी : डीआरआयच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती समजली होती की, रस्ते आणि रेल्वे मार्गांद्वारे विदेशी सोन्याची तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे, गेल्या काही दिवसत पाळत ठेऊन तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.
31.7 किलो सोन जप्त : नागपूरसह भारतात तीन ठिकाणी डीआरआय पथकांनी कारवाई केली आहे. नियोजित आणि सुव्यवस्थितपणे ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. त्यात सुमारे 31.7 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 19 कोटी रुपये आहे. ही कारवाई वाराणसी, नागपूर आणि मुंबई करण्यात आली आहे.
13 आणि 14 ऑक्टोबर दरम्यान झाली कारवाई : संपूर्ण देशभरात कारवाई करीत 18 कोटींच्या सोन्यासह 11 गोल्ड तस्करांना अटक करण्यात आली आहे. गोल्ड तस्करांचे सिंडीकेट 13 व 14 ऑक्टोबर दरम्यान उद्धवस्त करण्यात आले आहे.
आझाद हिंद एक्सप्रेसच्या मार्फत तस्करी : पुणे- हावडा एक्सप्रेसमध्ये दोन आरोपी सोने घेऊन प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती, महसुल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना समजली होती. दोन्ही आरोपीना नागपूर रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे 8.5 किलो इतक्या वजनाचे सोने आढळून आले. डीआरआय पथकानं रेल्वे सुरक्षा पथकाच्या मदतीनं दोघांना अटक केली आहे.
हेही वाचा -
Gold Smuggling : DRI ची मोठी कारवाई; मुंबईसह वाराणसी, नागपूर येथून 19 कोटींचं सोनं जप्त
Gold seized at Mumbai Airport : मुंबई विमानतळावर परदेशी महिलेकडून १.६३ कोटी रुपयांचं सोनं जप्त