'...त्यालाही पेट्रोल टाकून जाळा, पीडितेच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया' - hinganghat burning case
माझ्या मुलीचा चेहरा पूर्ण खराब झाला, काही दिवसांपूर्वी त्या मुलाला समज दिली होती. मात्र, त्याने ऐकले नाही. असे काही होईल असे आम्हाला वाटलेही नव्हते, असेही पीडित तरुणीच्या आईने सांगितले. शासनाने आम्हाला उपचारासाठी पूर्ण मदत करावी अशीही मागणी पीडित मुलीच्या आईने केली आहे.

नागपूर - '...माझ्या मुलीला पेट्रोल टाकून जाळलं तसं, त्याला सुद्धा जाळलं पाहिजे,' अशी उद्विग्न प्रतिक्रिया पीडित तरुणीच्या आईने दिली आहे. हिंगणघाटमधील नांदोरी चौकात सोमवारी सकाळी एका तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेत ती गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माझ्या मुलीचा चेहरा पूर्ण खराब झाला, काही दिवसांपूर्वी त्या मुलाला समज दिली होती. मात्र, त्याने ऐकले नाही. असे काही होईल असे आम्हाला वाटलेही नव्हते, असेही पीडित तरुणीच्या आईने सांगितले. शासनाने आम्हाला उपचारासाठी पूर्ण मदत करावी अशीही मागणी पीडित मुलीच्या आईने केली आहे.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड :'माझ्या मुलीला होणाऱ्या वेदना आरोपीला द्या'
दरम्यान, पीडित तरुणी हिंगणघाटपासून १० किमी अंतरावरील एका गावात राहते. ती दररोज हिंगणघाट येथे एका खासगी महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात होती. सोमवारी सकाळी महाविद्यालयात जात असताना नांदोरी चौकात तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटता टेंबा फेकण्यात आला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. काहींनी धाडस करत तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवत तिला उपजिल्हा रुग्णालयात नेले.
हेही वाचा - हिंगणघाट प्रकरण: पुढील 48 तास 'तिच्यासाठी' महत्वाचे
बाईट -- पीडित तरुणीची आई (चेहरा ब्लर करावा)Body:.Conclusion:null