ETV Bharat / state

नागपुरातील तरूणीवर महंताकडून बलात्कार; वृंदावनमधील प्रकार - VRINDAVAN RAPE CASE

नागपूरची रहिवाशी असलेल्या वाचक तरुणीवर वृंदावनमधील आश्रमाच्या महंताने बलात्कार केल्याची धक्कादायक घडली आहे. पूजा विधी शिकवण्याच्या बहाण्याने महंताने बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

NAGPUR RAPE CASE
नागपुरातील तरूणीवर वृंदावनमध्ये महंताकडून बलात्कार
author img

By

Published : Oct 30, 2020, 3:03 PM IST

नागपूर - नागपूरची रहिवासी असलेल्या वाचक तरुणीवर वृंदावनमधील आश्रमाच्या महंताने बलात्कार केल्याची धक्कादायक घडली आहे. पूजा विधी शिकवण्याच्या बहाण्याने महंताने बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. तहसील पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हे प्रकरण वृंदावन पोलिसांना वर्ग करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

नागपूरमधील कथा वाचक तरुणी गेल्या १० वर्षांपासून देशभरात कथा वाचनासाठी जात असते. जूनमध्ये फेसबुकवरून तिची ओळख मथुरा-वृंदावन येथील एका आश्रमात पुजारी असलेल्या दिनबंधु दास यांच्यासोबत झाली. फेसबुकवरून झालेल्या ओळखी नंतर व्हॉट्सअ‌ॅपवर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरू झाले. काही दिवसांनंतर आरोपीने बहाणा करुन तरुणाला वृंदावनला बोलावले. पीडितेला देखील संस्कृतमध्ये आचार्य पदवी प्राप्त करायची असल्याने नातेवाईकांच्या शिफारसीवरून वृंदावन येथील एका संस्कृत विद्यालयात प्रवेश घेतला. आरोपीने आपल्याच आश्रमात तिची राहण्याची व्यवस्था केली. यादरम्यान त्याने पूजा शिकविण्याच्या बहाण्याने पीडितेवर बलात्कार केला. घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दिले, मात्र लग्न करावे लागणार असल्याच्या भीतीने आरोपी दिनबंधू दास आश्रमातून पळून गेला. आश्रमातून दास पळाल्याची माहिती मिळताच पीडितेने नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत कागदपत्रे वृंदावन कोतवाली पोलीस कडे हस्तांतरित केली. घटनास्थळ हे वृंदावन येथे असल्याने पोलिसांनी झिरोंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वृंदावन येथेच होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.