नागपूर - संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे २ पोपटांची जुगलबंदी असल्याची टीका भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केली. राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून इतर दोन्ही नेत्यांनी आधीच ठरलेल्या विषयांवर मुलाखतीत चर्चा केली.
मुख्यमंत्रीची मुलखात म्हटलं की, सर्व जनतेचे लक्ष याकडे लागलेले असते. कारण मुख्यमंत्री जनतेच्या हिताचे कोणते मुद्दे मांडतात याकडे लक्ष लागलेले असते. पण राज्यातील प्रश्न सोडून इतर मुद्यांवर चर्चा करण्यात मुख्यमंत्र्यांनी धन्यता मानल्याचे गिरीश व्यास म्हणाले.
उद्धव ठाकरे अजित पवारांच्या दबावात
उद्धव ठाकरे हे अजित पवारांच्या दबावात काम करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. स्वत:ला शिवसेनेचे वाघ म्हणवून घेणारे आता चूप झाले आहेत. उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख आहेत. त्यांनी डरकाळी फोडून बोलावं पण तसे होत नसल्याचे ते म्हणाले. चेहरा रंगवून मिरवणुकीत फिरणारे असे वाघ नागपूरच्या चितारओळीत बघायला मिळतात अशीच अवस्था मुख्यमंत्र्यांची झाल्याचे व्यास म्हणाले.