ETV Bharat / state

Gautami Patil Controversy : गौतमी पाटील उशिरा आल्यानं हुल्लडबाजांनी तोडल्या खुर्च्या; पोलिसांचा लाठीचार्ज, पहा व्हिडिओ - Gautami Patil Program In Nagpur

Gautami Patil Controversy : पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालंय. नागपुरात गौतमी पाटील कार्यक्रमात उशिरा आल्यानं तरुणांनी त्याठिकाणी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना यावेळी लाठीचार्ज करावा लागला.

Gautami Patil Nagpur
Gautami Patil Nagpur
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 10:40 AM IST

Updated : Sep 30, 2023, 11:31 AM IST

नागपूर Gautami Patil Controversy : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा जोरदार राडा झाला आहे. कार्यक्रमात गौतमी पाटील तब्बल दोन तास उशीरा आल्यानं हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घालत तब्बल दोन डझन खुर्च्या तोडल्या आहेत. पोलिसांनी हुल्लडबाज तरुणांना हुसकावून लावण्यासाठी लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं. नागपुरातील हिल टॉप परिसरात गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ही घटना घडली. यानंतर आता पोलिसांनी आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

खुर्च्या तोडून गौतमीच्या दिशेने भिरकावल्या : गणेश विसर्जनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या उत्तर अंबाझरी येथील हिलटॉप एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीला बघण्यासाठी शहरातील तरुणांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, कार्यक्रमस्थळी गौतमी पाटील तब्बल दोन तास उशीरानं पोहचली. त्यामुळं काही तरुण संतापले. या तरुणांनी घटनास्थळीच हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. हुल्लडबाजांनी प्लास्टिकच्या खुर्च्या तोडून गौतमीच्या दिशेनं भिरकावल्या. कार्यक्रमात गोंधळ होत असल्याचं समजताच आयोजक आणि पोलिसांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतू तरीही हुल्लडबाज तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कार्यक्रमात आणखी काही अनर्थ घडू नये, म्हणून पोलिसांनी हुल्लडबाजांवर लाठीचार्ज केला. या गोंधळामुळे समोरील बॅरिकेट कोसळले. यानंतर मात्र हुल्लडबाज तरुणांना कार्यक्रमातून काढून देण्यात आलं. त्यानंतर उरलेला लावणी कार्यक्रम शांततेत पार पडला. आता पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

गौतमीच्या कार्यक्रमातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर : गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि हुल्लडबाजी हे समिकरण काही नवीन नाही. यामुळं गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ किंवा हुल्लडबाजी होवू नये, यासाठी महिलांना कार्यक्रमाच्या सुरक्षेत तैनात करण्यात आलं होतं. परंतू आता नागपुरात घडलेल्या घटनेनं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

हेही वाचा :

  1. FIR On Gautami Patil : गौतमी पाटील अडचणीत; नगरमध्ये गुन्हा दाखल, जाणून घ्या नेमकं काय आहे कारण ?
  2. Gautami Patil Programs: गौतमी पाटील पुन्हा चर्चेत... परंतु यावेळेस आहे वेगळं कारण, वाचा...
  3. Lavani Star Gautami Patil : तरुणांना घायाळ करणाऱ्या लावणी स्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Last Updated : Sep 30, 2023, 11:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.