नागपूर - सर्वांचा लाडका बाप्पा अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी सोमवारी अनेक ठिकणी विराजमान झाला आहे. नागपूरच्या चितरोळीमध्ये सकाळपासून सायंकाळी अगदी उशिरापर्यंत बाप्पाला घरी नेण्यासाठी भक्तांची गर्दी होती. तसेच बाप्पाचे अनेक रूपही यावेळी बघायला मिळाले. विघ्नहर्ता तू एक तुझे रूप अनेक असेच सगळे चित्र होते.
हेही वाचा - लालबागच्या राजाचं २४ तास LIVE दर्शन.. एका क्लिकवर
सार्वजनिक गणेश मंडळाचे बाप्पा नागरिकांसाठी विशेष आकर्षण आहेत. बाप्पाचे तऱ्हेतऱ्हेचे रुपे पाहून अंगावर शहारे फुलत होते. यात सैनिकांच्या गणवेशात बाप्पा देशाचे रक्षण करतानाची मूर्ती मुख्य आकर्षण होते तर स्त्री रक्षक बाप्पा सामाजिक संदेश देण्याचे काम करत होते. महादेवाच्या रूपातील बाप्पा, तिरुपती बालाजीच्या अशा अनेक निरनिराळ्या रुपातील बाप्पांचे दर्शन गणेश भक्तांनी घेतले.
हेही वाचा - LIVE बाप्पा मोरया ! राज्यभरात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; वाजत-गाजत बाप्पांचं आगमन