नागपूर - नितीन गडकरींनी २५ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी जनतेला संबोधित केले हा आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. त्याचबरोबर या संदर्भात उद्या निवडणूक अधिकाऱयांकडे गडकरींविरोधात तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सध्या सुरू आहे. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी नितीन गडकरींनी जनतेला संबोधित करुन आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे. त्याचबरोबर गडकरींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले आहे.