नागपूर - शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या विचारसरणीशी तडजोड केली, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
-
Union Minister Nitin Gadkari in Nagpur: Shiv Sena compromised with its ideology for chief minister post, Congress, NCP & Shiv Sena have come together solely for power. Shiv Sena only pretends to be bhagwa but in reality it is now coloured in Congress' colours. #Maharashtra pic.twitter.com/kdoK59sCHz
— ANI (@ANI) 3 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Union Minister Nitin Gadkari in Nagpur: Shiv Sena compromised with its ideology for chief minister post, Congress, NCP & Shiv Sena have come together solely for power. Shiv Sena only pretends to be bhagwa but in reality it is now coloured in Congress' colours. #Maharashtra pic.twitter.com/kdoK59sCHz
— ANI (@ANI) 3 January 2020Union Minister Nitin Gadkari in Nagpur: Shiv Sena compromised with its ideology for chief minister post, Congress, NCP & Shiv Sena have come together solely for power. Shiv Sena only pretends to be bhagwa but in reality it is now coloured in Congress' colours. #Maharashtra pic.twitter.com/kdoK59sCHz
— ANI (@ANI) 3 January 2020
शिवसेनेने सत्तेसाठी आपली विचारसरणीच बदलली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. शिवसेना ही आपण 'भगवा' असल्याचा दिखावा करते. मात्र, आता ती काँग्रेसच्या रंगांमध्ये रंगली आहे, असे म्हणत त्यांनी सेनेवर निशाणा साधला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सेना-भाजप युती बहुमतात असूनही, मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये विवाद झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत शिवसेनेने युती करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. धर्मनिरपेक्ष विचारसरणी असणारे काँग्रेस-राष्ट्रवादी, आणि हिंदुत्ववादी असणारी शिवसेना यांची युती झालेली पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तर दुसरीकडे, या युतीमुळे सर्वाधिक जागा मिळवूनही भाजप सत्तेबाहेर पडले होते.
हेही वाचा : 'सावरकरांना समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना राहूच कशी शकते?'