ETV Bharat / state

G२० Summit  : बाबासाहेबांनी घटना तर महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलं, भाजपाचं योगदान काय? विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

G20 Summits : डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य दिलं आहे, मात्र या देशाच्या इतिहासात भाजपाचं काय योगदान आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. जी20 परिषदेचे जागतिक नेत्यांनी राजघाटावर जात महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिल्यानं विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली.

G20 Summits
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 2:08 PM IST

नागपूर G20 Summits : जी20 परिषदेसाठी भारतात आलेल्या जागतिक नेत्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावरुन आता राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर बाबासाहेबांनी देशाला घटना दिली आहे, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलं, मात्र देशासाठी भाजपाचं काय योगदान आहे, असा सवाल केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या खोचक टीकेनं आता वादाला नवं तोंड फुटलं आहे.

  • .#WATCH | Nagpur: Maharashtra Leader of opposition(Congress) Vijay Wadettiwar says,"...Baba (Babasaheb Ambedkar) drafted the Constitution and Bapu ( Mahatma Gandhi) gave freedom to this country...One cannot understand India's history without these two...The whole world knows… pic.twitter.com/xcwJUbqbG9

    — ANI (@ANI) September 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले विजय वडेट्टीवार : जी20 च्या नेत्यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर चांगलाच निशाणा साधला आहे. 'बाबा' आणि 'बापू' यांनी हिंदुस्तानसाठी मोठं योगदान दिलं असल्याचं विजय वडेटटीवार यांनी स्पष्ट केलं. 'बाबा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली आणि बापू अर्थात महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे या दोघांना वगळून हिंदुस्तानचा इतिहास लिहिता येत नाही. देशाच्या इतिहासात भाजपाचं काहीच योगदान नाही. कोणाच्या समाधीवर जावं, असा प्रश्न आहे. भाजपाकडं असा कोणताच इतिहास नाही, ज्यांच्या समाधीवर जावं, त्यामुळे सगळ्या दुनियाला माहिती असलेल्या महात्मा गांधींच्या समाधीवर जी20 परिषदेचे नेते गेले. या देशात पंडित नेहरुंनी योगदान दिलं, सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे नेते होते, सरदार वल्लभभाई पटेल हे देखील काँग्रेसचे नेते होते. त्यामुळे भाजपाकडं असा कोणताही नेता नाही', असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

  • Nagpur: On Ajit Pawar's road show, Maharashtra Leader of Opposition(Congress) Vijay Wadettiwar says, "If the leaders of the Maratha community are doing road show during Maratha protest then the Maratha community will decide whom to support..." pic.twitter.com/0ZExFmIA7Y

मराठा आंदोलन सुरु असताना अजित पवारांचा रोड शो : एकीकडं मराठा आरक्षणासाठी आंदोलक आंदोलन करत आहेत. जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अद्याप सुरुच आहे. मात्र दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोड शो करत आहेत. त्यामुळे मराठा समाजानं कोणाला समर्थन द्यायचं हे ठरवावं, असं आवाहनही विजय वडट्टीवार यांनी केलं. अजित पवार यांच्या रोड शोवरुन विजय वडेट्टीवार यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं.

जी20 परिषदेचे जागतिक नेते राजघाटावर : जी20 परिषदेसाठी जागतिक पातळीवरील नेते दिल्लीत आले आहेत. जी20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. मात्र जी20 परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरु होण्यापूर्वीच विविध देशातील दिग्गज नेत्यांनी राजघाटावर पोहोचत महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नेत्यांना महाराष्ट्रातील बापू कुटीची प्रतिमा भेट दिली.

हेही वाचा :

  1. Vijay Wadettiwar Reaction : ...तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा, विजय वडेट्टीवार यांची मागणी
  2. Vijay Vadettiwar On Maratha Reservation : मराठा, कुणबी वाद लावण्यात भाजपाला यश - वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.