ETV Bharat / state

नागपूर : प्लॉट विकताना खोट्या कागदपत्राच्या आधारे फसवणूक; युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल - प्लॉट विकताना फसवणूक नागपूर

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (ajani police station area) राहणारे प्रशांत जवणे यांनी बेसा परिसरातील जयगुरुदेव नगरमध्ये वंदना चाचेरकर यांच्याकडून २५ लाख रुपयांमध्ये दोन प्लॉटची खरेदी केली होती.

ajani police station
अजनी पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 23, 2021, 12:16 PM IST

नागपूर - प्लॉट विक्री करताना खोट्या कागदपत्राच्या आधारे दोघांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Fraud over selling plots by false documents) याप्रकरणी युवा सेनेचा प्रदेश सहसचिव विशाल केचेसह (yuva sena nagpur) पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नागपुर शहरातील अजनी पोलिसांनी केली. (ajani police station)

याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी

काय आहे प्रकरण?

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे प्रशांत जवणे यांनी बेसा परिसरातील जयगुरुदेव नगरमध्ये वंदना चाचेरकर यांच्याकडून २५ लाख रुपयांमध्ये दोन प्लॉटची खरेदी केली होती. सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर प्रशांत जवणे यांनी प्लॉटचा ताबा घेतला. प्लॉटवरील कचरा साफ करताना आणखी दोघांनी त्या प्लॉटवर आपला हक्क सांगितला. तेव्हा हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले असता या प्रकरणात युवा सेनेचा प्रदेश सहसचिव विशाल केचेसह पाच जणांचे नावे पुढे आली आहेत. यांनी बनावट कागदपत्रे तयार करून ते प्लॉट दोघांना विकल्याचे उघड झाले आहे. यामुळे अजनी पोलिसांनी विशाल केचेसह मंगेश सेंगर, शोभा वामन काळे, लक्ष्मी यशवंत चाफले, पुरुषोत्तम काळे या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - संघाचे निष्ठावंत राहिलेले छोटू भोयर यांना काँग्रेसची उमेदवारी, नागपुरात भाजपला मोठे आव्हान

प्रकरणाचा तपास सुरू -

या प्रकरणात ज्यांच्या विरुद्ध तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी आणखी कुणाची फसवणूक केली आहे का? याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, तपास अगदीच प्राथमिक स्तरावर असल्याने या संदर्भात फार माहिती उपलब्ध झाली नसल्याचे पोलीस निरीक्षक विजय तलवारे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.