ETV Bharat / state

नागपुरात आंध्रा बँकेच्या व्यवस्थापकानेच बनावट ग्राहकाद्वारे लुटले कोट्यावधी रुपये; तिघांना अटक - POLICE

पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. इतवारीतील आंध्रा बँकेतील सहायक व्यवस्थापक अनघा भुसारी हिने झटपट पैसा कमवण्यासाठी अमोल आणि मंगेश यांची मदत घेतली.

आंध्रा बँक
author img

By

Published : Jul 12, 2019, 8:32 PM IST

नागपूर - ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत लाखांचे कर्ज काढून आंध्रा बँकेची फसवणूक केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. लकडगंज पोलिसांनी या घोटाळ्याच्या मास्टरमाइंड आणि बँकेच्या सहायक व्यवस्थापक अनघा भुसारी, अमोल कुंभारे आणि मंगेश जगताप या तीन आरोपींना अटक केली. या प्रकरणात आणखी फसवणूक झालेल्यांचा आकडा वाढणार असून कोट्यावधींचा घोटाळा असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भानुदास पिदूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

या बँक घोटाळ्याची मास्टरमाइंड ही बँकेची सहाय्यक व्यवस्थापक अनघा भुसारी आहे. अनघाने ऑगस्ट 2017 मध्ये अमोल आणि मंगेश यांच्या मदतीने वृत्तपत्रात कर्ज देण्यासंदर्भात जाहिरात दिली होती. ग्राहकांनी कर्जासाठी अमोल आणि मंगेश या दोघांकडे कागदपत्र जमा केले. मात्र, कालांतराने कर्ज नामंजूर झाल्याचे त्यांनी ग्राहकांना सांगितले. त्यानंतर याच कागदपत्रांच्या आधारे तिघांनी बनावट ग्राहक उभे करून लाखो रुपयांचे वाहन, गृह आणि मुद्रा कर्ज दिले. दरम्यान, धर्मा पांडे या व्यक्‍तीने गृहकर्जासाठी बँकेत अर्ज केला. मात्र, त्यांनी आंध्रा बँकेतून 35 लाखांचे कर्ज काढल्याचे समोर आले. पांडे यांनी आंध्रा बॅंकेत चौकशी केली असता बनावट व्यक्ती उभा करून त्यांच्या नावे कर्ज काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. इतवारीतील आंध्रा बँकेतील सहायक व्यवस्थापक अनघा भुसारी हिने झटपट पैसा कमवण्यासाठी अमोल आणि मंगेश यांची मदत घेतली. या तिघांनी जाहिरातीद्वारे जमा केलेल्या नागरिकांच्या दस्तऐवजाच्या आधारे आंध्रा बँकेत बनावट ग्राहक उभे करून कोट्यवधींचे कर्ज घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून फसवणुकीचा आकडा वाढू शकतो, अशी शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Intro:नागपुरात ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत लाखांचं कर्ज काढून आंध्रा बॅंकेची फसवणूक केल्याचं प्रकरण पुढं आलंय. लकडगंज पोलिसांनी या घोटाळ्याच्या मास्टरमाइंड आणि बॅंकेच्या सहायक व्यवस्थापक अनघा भुसारी, अमोल कुंभारे, आणि मंगेश जगताप या तीन आरोपींना अटक केलीय. या प्रकरणात आणखी फसवणुक झालेल्यांचा आकडा वाढणार असून कोट्यावधींचा घोटाळा असण्याचा अंदाज पोलिसांचा आहे.
Body:या बॅंक घोटाळ्याची मास्टरमाइंड ही बॅंकेची सहाय्यक व्यवस्थापक अनघा भुसारी आहे. अनघानं ऑगस्ट 2017 मध्ये अमोल आणि मंगेश यांच्या मदतीनं वृत्तपत्रात कर्ज देण्यासंदर्भात जाहिरात दिली होती. ग्राहकांनी कर्जासाठी अमोल आणि मंगेश या दोघांकडे कागदपत्र जमा केले. मात्र, कालातरांनं कर्ज नामंजूर झाल्याचं त्यांनी ग्राहकांना सांगितलं. त्यानंतर याच कागदपत्रांच्या आधारे तिघांनी बनावट ग्राहक उभे करून लाखो रुपयांचे वाहन, गृह आणि मुद्रा कर्ज दिले. दरम्यान, धर्मा पांडे या व्यक्‍तीनं गृहकर्जासाठी बॅंकेत अर्ज केला. मात्र, त्यांनी आंध्र बॅंकेतून 35 लाखांचे कर्ज काढल्याचं समोर आलं. पांडे यांनी आंध्र बॅंकेत चौकशी केली असता बनावट व्यक्ती उभा करून त्यांच्या नावे कर्ज काढण्यात आल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय....इतवारीतील आंध्रा बॅंकेतील सहायक व्यवस्थापक अनघा भुसारी हिनं झटपट पैसा कमविण्यासाठी अमोल आणि मंगेश यांची मदत घेतली. या तिघांनी जाहिरातीद्वारे जमा केलेल्या नागरिकांच्या दस्तऐवजाच्या आधारे आंध्रा बॅंकेत बनावट ग्राहक उभा करून कोट्यवधींचं कर्ज घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून फसवणुकीचा आकडा वाढू शकतो, अशी शक्‍यता पोलिसांनी वर्तविलीय.
बाईट : भानुदास पिदूरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.