ETV Bharat / state

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नितीन राऊतांच्या पाठीशी नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे - नागपूर ऊर्जामंत्री नितीन राऊत

राज्यात वाढीव वीज बिलांमध्ये कोणताही दिलासा मिळणार नाही, असे खुद्द ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर विरोधी पक्षांकडून यावर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या विषयावर भाष्य करत राज्य सरकारवर टीका केली.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Nov 19, 2020, 3:41 PM IST

नागपूर - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पाठिशी नाहीत. त्यामुळे अधिकारीही त्यांचे ऐकत नाहीत, म्हणून हे सगळे घडत आहे. अशातच राऊत यांनी वीज बिलामध्ये तडजोड होणार नाही, असे सांगितले. यावरून आज भाजप नेते माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. आज नागपुरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय ऊर्जामंत्र्यांनी लोकांना दिलासा न दिल्याने लोक चिडले आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

पत्रकार परिषद, नागपूर

राज्यात वाढीव वीज बिलांमध्ये कोणताही दिलासा मिळणार नाही, असे खुद्द ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर विरोधी पक्षांकडून यावर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या विषयावर भाष्य करत राज्य सरकारवर टीका केली. मार्च-एप्रिल महिन्यातील अँव्हरेज बील वीज कंपन्यांकडून पाठविले जात आहे. या महिन्यात सर्व बंद असताना इतके वीज बील सरसकट कसे पाठवू शकता? त्यामुळेच जनता नाराज होत रोष व्यक्त करत आहे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.

राज्य सरकारकडून नितीन राऊतांना कमी निधी

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पाठिशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाहीत. त्यामुळे अधिकारीही त्यांचे ऐकत नाहीत, अशी टीकाही यावेळी बावनकुळे यांनी केली. पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. शिवाय राज्य सरकार नितीन राऊत यांना कमी निधी देऊन त्यांच्यावर अन्याय करत आहे. आम्ही आमच्या काळात शेतकऱ्यांना व वीज ग्राहकांना वेळोवेळी दिलासा दिला. मात्र, या सरकारकडून ते होत नसल्याचे दिसून येत आहे. सोबतच आमच्या काळात जो विकास झाला आहे, तेवढे कोणीही करू शकले नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे राऊत यांनी जनतेला दिलेले आश्वासन एका मिनिटात निपटू शकतात. त्याकरिता मुख्यमंत्र्यांनी निधी बाबतच्या फाईलवर स्वाक्षरी करून लोकांना दिलासा द्यावा, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.