ETV Bharat / state

नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे कोरोनामुक्त - नागपूर लेटेस्ट न्यूज

नागपूर महानगरपालिकेत सात महिन्यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळातील साडेपाच महिने कोरोना महामारीविरुद्ध यंत्रणाप्रमुख म्हणून कार्य करण्याचा योग आला. यादरम्यान सर्व प्रोटोकॉल पाळले. मात्र, कर्तव्य बजावताना मलाही कोरोनाची लागण झाली. २४ ऑगस्टला चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, आता कोरोनामुक्त झालो असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

tukaram mundhe corona free  nagpur municipality news  nagpur latest news  नागपूर लेटेस्ट न्यूज  तुकाराम मुंढे कोरोनामुक्त न्यूज
माजी आयुक्त तुकाराम मुंढे
author img

By

Published : Sep 7, 2020, 1:44 PM IST

नागपूर - महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यासंदर्भांत त्यांनी एक पोस्ट ट्विट केली आहे. ते सध्या नागपुरातील निवासस्थानी आहेत. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ते पुढील काही दिवस गृह विलागीकरणामध्ये राहणार आहेत. त्यानंतर मुंबईला जाऊन आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

  • Way to Recovery
    Today my #Covid_19 result is Negative. Positivity of Covid needs to be fought with Positivity of thought & action. Strong will power, focused & collective efforts will overcome the crisis. Collective Societal actions required for a better future, including health pic.twitter.com/kziun7Q1fQ

    — Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) September 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यानुसार प्रबळ इच्छाशक्ती, शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी आज कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. नागपूर महानगरपालिकेत सात महिन्यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळातील साडेपाच महिने कोरोना महामारीविरुद्ध यंत्रणाप्रमुख म्हणून कार्य करण्याचा योग आला. यादरम्यान सर्व प्रोटोकॉल पाळले. मात्र, कर्तव्य बजावताना मलाही कोरोनाची लागण झाली. २४ ऑगस्टला चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. शासनाच्या दिशानिर्देशानुसार नियमांचे पालन करत आयसोलेशन पिरियड सुरू झाला. चाचणीचा निकाल आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मात्र, कुठल्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कारण, कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीवर मात करायची असेल तर विचारांची सकारात्मकता आवश्यक आहे. ही सकारात्मकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांच्या जोरावर आज कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाले. समाजातील दुष्प्रवृत्ती आणि कुविचारांवर मात करण्यासाठी सुद्धा या गोष्टी आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली दांडगी इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि ध्येयनिश्चितीच्या जोरावर समाजात सकारात्मकता पसरवावी, हीच सदिच्छा...!, असे तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.