नागपूर - वन विभागाकडून वन्य प्राण्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. बुट्टीबोरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सापळा रचून चौघांना अटक केली आहे. मागील आठवड्याभरात चौथ्यांदा झालेल्या कारवाईने शिकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. हे चारही प्रकरण एकमेकांशी जुळले असल्याची शंका आहे. आतापर्यंत वन विभागाने 18 जणांना ताब्यात घेण्यात आले असून वाघ नख, हाड सहा अन्य वन्यप्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आले आहे. यात मुख्य आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध घेत आहे.
नागपूर वनविभागात मागील आठ दिवसात एकामागून एक अशी चौथी कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये बुट्टीबोरीं वनपरिक्षेत्र कार्यलया ही कारवाई करण्यात आली. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वर्धारोड टि-पाईटच्या पुलाजवळ वाघाचे नख विक्री होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागास मिळाली. यात सापळा लावून वन विभागाने वाघाच्या 7 नग नखासह महादेव आडकु टेकाम (63) पांचगाव, गोकुळदास दिगांबर पवार(38) ताब्यात घेण्यात आले. त्यांची रात्री चौकशी केली असता एल.व्ही. ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, बुटिबोरी यांचे नेतृत्वात एक पथक मौजा पांचगाव येथे रवाना करण्यात आले. चंद्रपूर वन विभागासोबत संयुक्त कार्यवाही करून रामचंद्र नागू आलाम (60), विजय लक्ष्मण आलाम (65) यांना ताब्यात घेण्यात आले. अश्या पद्धतीने चौघांना ताब्यात घेण्यात आले.
अडीच वर्षांपूर्वी त्यांनी केली शिकार -
मौजा पाचगाव ते परसोडी जंगलाच्या परिसरात हा दोन ते अडीच वर्षांपूवी या वाघाची शिकार केल्याची कबुली आरोपीनी दिली. यामध्ये त्याचे अवयव आणि कातडी, दात हे आपसात वाटून घेतल्याचे त्यांनी तपासत सांगितले. यात आंतरराष्ट्रीय तस्करांचे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे.
हे अवयव केले जप्त -
यावेळी त्याच्या घरातून वाघाचे हाड, मिश्या, वाघाचे दात, वाघाच्या कातड्याचे तुकडे, मोराचे पाय आणि नखे, घुबडाचे पाय, सायाळचे क्विल्स, मोराचे पिस, विषारी झाडांच्या बिया, साल, मुळ व खोडाचे तुकडे, तार फासे तार फासे मोठे बंडल, विळा, टेप, गर व गराचा धागा कथिल धातु इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील एक आरोपीला अर्धांगवायु -
तसेच वसंता आडकु टेकाम, वय 62 वर्षे हे शरीराने पॅरालेसीस झाल्याने ताब्यात न घेता. मात्र त्यांच्या घराची झडती घेतली असता वाघाच्या अवयवासह विविध वन्यप्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे विविध कलमान्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे पथक प्रमुख नरेंद्र चांदेवार यांनी सांगितले. ही करवाई नागपूर विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात वन अधिकारी पीजी कोडापे, साह्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, संदीप गिरी, ववनपरिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. ठोकळ, वनपाल केकान आणि वनरक्षक कु. नागरगोजे यांनी ही कारवाई केली.