नागपूर - मागील अडीच महिन्यात 7 वाघांची शिकार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यामध्ये तीन वाघांची शिकार अंधश्रद्धेतून झाली असून ज्यात 10 दिवसाच्या बछड्याचा समावेश आहे. यात वन्यप्राण्यांच्या अवयवांचा उपयोग पूजा पाठ आणि त्यातून पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेपोटी केला जात आहे. यामध्ये मागील अडीच महिन्यात वनविभागाने केलेल्या कारवाईमध्ये 39 तस्कर जेरबंद केले असून वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यांना वनविभाग आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या पथकाने अटक केली आहे. यात काही लोक सुशिक्षित असल्याचेही पुढे आले आहे.
कोरोनाच्या काळात तसेच मागील दोन अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची शिकार झाली आहे. यासाठी वन उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंग हाडा यांनी पदभार स्वीकारल्यापासून मोठ्या प्रमाणात करवाईला गती दिली आहे. यात नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यात चिंचबोडी येथे गावातील सरपंच लोमेश दाबले याला 10 दिवसाच्या बछड्याची शिकार केल्याच्या प्रकरणात जेरबंद केले तसेच त्याचा सहकारी कालिदास रायपूर हा पदवीधर असून तो दुचाकीच्या शोरूमध्ये काम करतो. यात वाघाची शिकार करून पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी पूजा केली. यामध्ये पूजा निष्फळ ठरल्याने त्या 10 दिवसीय वाघाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृत शरिराचे जतन केले असून आता चार महिन्याने त्या बछड्याच्या मृत शरीराची किंमत 20 लाख रुपये ठेवण्यात आली. विक्रीच्या बेतात असताना वनविभागाच्या हाती लागले.
भन्नाट व्हिडीओ पाहून कोणीही विश्वास ठेवेल... पण सगळी हात चालाखी
10 महिन्याच्या वाघाच्या शावकाचा मृत्यू झाला. पण काय केले त्याचे असा प्रश्न पडला असेलच. यात पैसा पाडण्यासाठीचा प्रकार कसा घडतो याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहे. त्यामध्ये मानवी हाडांचा सांगाळा हा जमिनीवर ठेवण्यात आलेले आहे. एक व्यक्ती वन्य प्राण्यांच्या अवयवाचा सह्याने पूजा पाठ करून आत्मा बोलवतो. त्यात मग ही आत्मा त्यांना सांगितलेल्या जागेवरून पैसा आणून देते. या व्हिडिओमध्ये असेच दिसत असले तरी हे सर्वच हात चलाखीचा प्रकार असतो. यात हे सगळे माहीर असतात. असे व्हिडिओ तयार करून लोकांना भ्रमित करून फसवणूक केली जाते. याच पद्धतीने आमिष देऊन लोकांना या जाळ्यात ओढले जात असल्याचे वन विभागाचे पथक प्रमुख नरेंद्र चांदेवर यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले.
वन्यप्राण्यांच्या अवयवाचा उपयोग होतो पूजेसाठी -
या पद्धतीचे व्हिडिओ तयार करून विश्वास ठेवतात. यात काही लोक पैसा मिळावा म्हणून वन्यप्राणी आणि त्यांचे अवयव आणण्यास सांगतात. यात कधी वाघाचे हाडे, पंजे, मिश्या, वाघाचे कातडे, घुबड, घुबडाचे अवयव, खवले मांजर, त्याचे खवले, दात या अवयवांची उपयोग करून अघोरी पूजा पाठ करण्यासाठी होतो. या मानवी सांगाडाच्या जो त्या वाटीतील घुबडाचे शरीराचा अवयव असण्याची शक्यता आहे. त्याचा उपयोग केल्याचे दाखवून विश्वास ठेवून हे होत असल्याचे दाखवतात. यात मागील सात पैकी तीन कारवाईमध्ये या सर्व बाजू पुढे आले आल्या आहेत.
अंधश्रद्धा आणि अवयव विक्रीसाठी करवाई -
वन विभागाने सात कारवाया केल्या असून त्यात तीन वाघांची शिकार केली आहे. त्यामध्ये 27 जुलैच्या सुमारास मध्यप्रदेशच्या बिछवासहनी आणि पांढुर्णा भागात केलेल्या करवाईत तसेच 25 ऑगस्ट दरम्यान झालेल्या करवाईत रामटेक तालुक्यातील पिंडकेपार इथेही कारवाई करण्यात आली. यात 27 ऑगस्टला चंद्रपूर जिल्ह्याच्या कोल्हार भागात झालेल्या करवाईत सुद्धा वाघाची शिकार अंधश्रद्धेतून झाली होती. यासोबत नुकतीच 6 ऑक्टोम्बरला चिंचबोळीच्या कारवाईत 10 महिन्याचा बछड्याची शिकार झाली. यासोबत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरडा येथे कारवाई करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्याच्या बालाघाट येथील कटगी तालुक्यातूनही काही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती साह्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवर यांनी दिली.
विविध स्तरावर चालतात व्यवहार -
यात पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात लोकल स्तरावर खासकरून जंगल जवळ असलेल्या लोकांच्या माध्यमातून वन्य प्राण्यांची शिकार केली जाते. त्यांचाकडून शिकार झाल्यानंतर त्यावन्य प्राण्यांच्या अवयवांची आपसात वाटप होते. त्यानंतर काही लोकांच्या माध्यमातून खरेदी विक्रीसाठी काढले जाते. मग यातील काही लोक हे अंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतात.
कोट्यवधीच्या घरात विकले जाते वन्यप्राण्याचे अवयव -
नुकतेच्या कारवाई समोर आले की 10 दिवसाच्या मृत वाघाच्या बछड्याच्या अवयवांची किंमत 20 लाख रुपये ठेवण्यात आली होती. यावरून हा अंदाज लावू शकतो की किंमत किती असेल. यात अवयवांची किंमत लोकल स्तरावर काही लाखातून सुरू होतो. वरच्या पातळीत 50 लाख ते 1 कोटी रुपयात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ही किंमत कोट्यावधीच्या घरात जाऊन पोहचतो. यामुळे मोठे टोळ्या यात सक्रिय असून अनेक वाघांच्या शिकार होत आहे.
यात उघडकीस आलेल्या कारवाई या दोन ते तीन वर्षांच्या घरात या वाघांच्या शिकारीच्या घटना आहे. काही वाघ हे दोन तर चार वर्षापूर्वी शिकार झाल्या असल्याचे वन विभागाच्या तपासत पुढे आले. पण कोरोनाच्या काळात अडचणीत सापडल्याने आर्थिक आणि पैशायच्या गरजेपोटी अवयव बाजारात आले आहे. यामुळे सात करवाई समोर आल्या सल्या तरी अनेक कारवाई आहे ज्याचा थांगपत्ता कुठेच लागला नाही. म्हणजे वाघाचा शिकार यापेक्षा अधिकच असण्याची शक्यता आहे. या करवाईत अजूनही आंतरराष्ट्रीय संबंध उघड येणारे रॅकेट अजून लागले नसून याचा शोध सुरू केला आहे. यात मध्यप्रदेश, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती तसेच वर्धा या जिल्ह्यातून ही करवाई झाली आहे. यात काही उच्चशिक्षित असून सुद्धा या लोकांच्या नादी लागून वन्य तस्कर बनून बसले आहे.