नागपूर- गोड्या तेलात भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपुरातील जेठानंद ट्रेडिंग कंपनी नामक तेलाच्या गोडाऊन वर छापा मारून लाखो रुपये किमतीचे भेसळयुक्त तेल जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या तेलाचे काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत.
पाच महिन्यांपूर्वी सुद्धा याच कंपनीवर अन्न आणि औषध विभागाने छापा टाकून परवाना रद्द करण्याची कारवाई केली होती. मात्र, जेठानंद कंपनीच्या संचालकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या डोळ्यात धूळफेक करून इतवारी परिसरातील मिरची बाजार परिसरातील दुकानांत तेलात भेसळ करून विक्री करणे सुरू केला होते.
अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती समजताच पुन्हा धाड टाकून सुमारे एक हजार लिटर भेसळयुक्त खाद्य तेल जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या तेलाचे काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.