ETV Bharat / state

नागपुरात पोलिसांचेच ड्रग्स माफियांशी साटेलोटे, पाच पोलीस निलंबित

नागपूरमधील नंदनवन पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने १४ ऑक्‍टोबरला अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत जमाल शेख आणि जावेद अली यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांना अमली पदार्थासहित पकडले होते. या कारवाई दरम्यान जमाल पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता. हे प्रकरण दाबण्यासाठी आरोपी जावेदला हवालदार सचिन एनप्रेड्डीवार यांनी अडीच लाखांची मागणी करत जप्त केलेले ड्रग्ससुद्धा ठेवून घेतले होते.

नागपूरात पोलिसांचेच ड्रग्स माफियांशी साटेलोटे, पाच पोलीस निलंबित
author img

By

Published : Oct 22, 2019, 7:19 PM IST

नागपूर - पोलीस उपायुक्तांनी नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत ३४ ग्रॅम अमली पदार्थ आणि २ लाख ४५ हजार रुपये जप्त करण्यात आले असून ड्रग्स माफियांशी संबंध असलेल्या पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नागपूरात पोलिसांचेच ड्रग्स माफियांशी साटेलोटे, पाच पोलीस निलंबित

नागपूरमधील नंदनवन पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने १४ ऑक्‍टोबरला अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत जमाल शेख आणि जावेद अली यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांना अमली पदार्थासहित पकडले होते. या कारवाई दरम्यान जमाल पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता. हे प्रकरण दाबण्यासाठी आरोपी जावेदला हवालदार सचिन एनप्रेड्डीवार यांनी अडीच लाखांची मागणी करत जप्त केलेले ड्रग्ससुद्धा ठेवून घेतले होते.

हेही वाचा - मुंबईत लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

गुन्हे शोध पथकाकातील कर्मचाऱ्यांनी २ लाख ४५ हजार रुपये आणि ३४ ग्रॅम एमडी ड्रग पोलीस स्टेशन मध्येच ठेवून घेतले पण पुढील कोणतीही कारवाई केली नाही. या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठांना मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्तांनी केलेल्या कारवाईत नंदनवन पोलीस स्टेशनमधून अमली पदार्थ आणि २ लाख ४५ हजार रुपये जप्त करण्यात आली. या प्रकरणात पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - पासोडीत गांजा शेतीवर पोलिसांचा छापा, 19 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

नंदनवन पोलीस स्टेशनमधील या कारवाईत पोलीस उपायुक्तांनी आरोपी पोलीस हवालदार सचिन एनप्रेड्डीवार, नायक शिपाई राजेंद्र शिरभाते, दिलीप अवगन, रोशन निंबर्ते आणि अभय मारोडे यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. ड्रग्स माफियाशी संबंध असलेल्या या पोलिसांवर कारवाई झाल्याने नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Intro:नागपूरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपायुक्तांनी छापा टाकला, या कारवाईत पोलीस स्टेशनमधून
34 ग्रॅम एमडी ड्रग्स आणि 2 लाख 45 हजार रुपये जप्त करण्यात आल्यानं, नागपूर पोलीस दलात खळबळ उडालीय. या प्रकरणात ड्रग्स माफियाशी संबंध असलेल्या पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आलीय...
Body:नागपूरातील नंदनवन पोलिसांच्या डीबी पथकाने 14 ऑक्‍टोबरला ड्रग्स जप्त केले, या कारवाईत त्यांनी जमाल शेख आणि जावेद अली यांच्यासह त्याच्या काही साथीदारांना ड्रग्ससह पकडले होते... कारवाई दरम्यान जमाल पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला....पण प्रकरण दाबण्यासाठी आरोपी जावेदला हवालदार सचिन एम्प्रेडीवार यांनी अडीच लाखांची मागणी केली,आणि जप्त केलेले ड्रग्ससुद्धा ठेवून घेतले.... डीबी पथकाली कर्मचाऱ्यांनी २ लाख ४५ हजार रुपये आणि ३४ ग्रॅम एमडी ड्रग पोलीस स्टेशन मध्येच ठेवले...पण पुढील कुठलीही कारवाई केली नाही. या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठांना मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्तांनी केलेल्या कारवाईत नंदनवन पोलीस स्टेशनमधून ड्रग्स आणि २ लाख ४५ हजार रुपये जप्त करण्यात आलेय.....या प्रकरणात पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय.....नंदनवन पोलीस स्टेशनमधील या कारवाईत पोलीस उपायुक्तांनी, आरोपी पोलिस हवालदार सचिन एम्प्रेडीवार, नायक शिपाई राजेंद्र शिरभाते, दिलीप अवगन, रोशन निंबर्ते आणि अभय मारोडे यांच्यावर कारवाई करत अटक केलीय. ड्रग्स माफियाशी संबंध असलेल्या या पोलिसांवर कारवाई झाल्यानंतर, नागपूर पोलीसदलात खळबळ उडालीय.

बाईट - राजेंद्र निकम, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, गुन्हे शाखा
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.