ETV Bharat / state

नागपूर महापालिकेत 5 दिवसांचा आठवडा, आयुक्त तुकाराम मुंढेंनी काढले परिपत्रक - Nagpur latest news

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परिपत्रक काढले आहे. 29 फेब्रुवारीपासून नागपूर महापालिकेत 5 दिवसांचा आठवडा सुरू होणार आहे.

Nagpur municipality
नागपूर महानगरपालिका
author img

By

Published : Feb 27, 2020, 8:13 PM IST

नागपूर - पाच दिवसांचा आठवडा या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने सुरू केला आहे. महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांच्या आठवड्याचे परिपत्रक काढले आहे. या 5 दिवसांच्या आठवड्यातून अत्यावश्यक विभाग अग्निशमन, पाणीपुरवठा आणि आरोग्य यांना वगळण्यात आले आहे.

हेही वाचा - नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यात हाणामारी, 93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा समावेश

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे परिपत्रक काढले आहे. 29 फेब्रुवारीपासून नागपूर महापालिकेत 5 दिवसांचा आठवडा सुरू होणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेच्या सर्वसामान्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू होणार आहे. सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असणार आहेत.

तर कार्यालयाच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 अशी कामकाजाची वेळ ठरवण्यात आली आहे.

हेही वाचा - मराठी भाषा गौरव दिन : आजच्या विद्यार्थ्यांना मराठी किती येते ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.