ETV Bharat / state

आधी प्रेम नंतर तिरस्कार; कुत्र्याच्या पिल्लाला गच्चीवरून फेकले - nagpur animal news

स्नेहल नगर परिसरारील राहुल नामक इसमाने मुलांना खेळण्यासाठी तीन-चार महिन्यांचे कुत्र्याचे पिल्लू घरी आणले होते. मात्र, चार दिवसातच पिल्लू नकोसे झाले. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी चक्क त्या पिल्लाला गच्चीवरून खाली फेकून दिले. ज्यामुळे ते कुत्र्याचं पिल्लू गंभीर जखमी झाले आहे. सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशनच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

dog thrown from gallery
dog thrown from gallery
author img

By

Published : Jun 16, 2021, 10:15 AM IST

नागपूर - नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्नेह नगर परिसरात राहणाऱ्या एका इसमाने चार दिवसांपूर्वी घरी आणलेल्या कुत्र्याच्या पिल्याला चक्क घराच्या गच्चीवरून खाली फेकल्याची घटना घडली आहे. उंची वरून खाली पडल्यामुळे ते श्वान गंभीर जखमी झाले आहे. ज्यामुळे प्राणी प्रेमी चांगलेच संतापलेले आहेत. या संदर्भात प्राणी प्रेमी संस्था सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्रतापनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिल्लाला गच्चीवरून फेकले
पिल्लाला गच्चीवरून फेकले

स्नेहल नगर परिसरारील राहुल नामक इसमाने मुलांना खेळण्यासाठी तीन-चार महिन्यांचे कुत्र्याचे पिल्लू घरी आणले होते. मात्र, चार दिवसातच पिल्लू नकोसे झाले. त्यानंतर त्यांनी त्या कुत्र्याला दूर सोडून दिले. मात्र, त्याला मुलांचा लळा लागल्याने ते पिल्लू परत-परत राहुल यांच्या घरी येऊ लागले. त्यामुळे संतापलेल्या त्या इसमाने पिल्लाला रात्रभर गच्चीवर ठेवले. त्यानंतर राग शांत न झाल्याने त्यांनी चक्क त्या पिल्लाला गच्चीवरून खाली फेकून दिले. ज्यामुळे ते कुत्र्याचं पिल्लू गंभीर जखमी झाले आहे. या संदर्भात सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशनच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुत्र्याचं पिल्लू प्रचंड दहशतीत
सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशनच्या सदस्यांना या संदर्भात माहिती समजताच त्यांनी त्या कुत्र्याला रुग्णालयात नेऊन उपचार केले. सध्या हे पिल्लू संस्थेच्या शेलटर होम मध्ये असून प्रचंड दहशतीत मध्ये आहे. तो कुणालाही जवळ देखील येऊ देत नाही.

हेही वाचा - पुन्हा नकोशी.! देवळा येथील वासोळ्यात सापडले स्त्री जातीचे अर्भक; कुत्रा चावल्याने जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.