ETV Bharat / state

भाजप कार्यालयात अध्यक्षांच्या पदग्रहण समारंभावेळी आग, उर्वरित कार्यक्रम उरकला अंधारात

नागपूर - भाजप कार्यालयात नवीन शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांचा आज पदग्रहण समारंभ होता. यादरम्यान सभागृहातील एमसीबीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला. त्यामुळे हॉलमध्ये आग लागल्याने कार्यकर्त्यांना हॉलमधून खाली उतरवण्यात आले. विजपुरवठा खंडित झाल्याने सभागृहाच्या खालीच अंधारात उर्वरित पदग्रहण कार्यक्रम उरकण्यात आला आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग
author img

By

Published : Jun 23, 2019, 10:26 PM IST

नागपूर - भाजप कार्यालयात नवीन शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांचा आज पदग्रहण समारंभ होता. यादरम्यान सभागृहातील एमसीबीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला. त्यामुळे हॉलमध्ये आग लागल्याने कार्यकर्त्यांना हॉलमधून खाली उतरवण्यात आले. दरम्यान आग किरकोळ असल्याने लवकर आटोक्यात आली आहे.

भाजप कार्यालयात आज नवनियुक्त शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांचा पदग्रहण समारोह आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार आणि आमदारासह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी कार्यालयाच्या सभागृहात जमली होती.

प्रवीण दटके यांच्या पदग्रहण समारंभात शॉर्ट सर्किटमुळे आग

प्रवीण दटके यांच्या भाषणाला सुरुवात झाली होती. त्यावेळी भाषण सुरु असताना हॉलमधील एमसीबीमध्ये अचानक ठिणगी उडाली आणि त्यातून धूर निघायला सुरुवात झाली. त्यामुळे धूर पाहून कार्यकर्ते आणि पाहुण्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हॉलमध्ये गोंधळ होताना पाहून सर्व कार्यकर्ते आणि पाहुण्यांना सभागृहातून खाली उतरवण्यात आले.

दरम्यान अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली होती. मात्र अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत कार्यकर्त्यांनी सतर्कता बाळगत आग विझवण्याऱ्या सिलेंडरच्या साहाय्याने आग विझवली. आग किरकोळ असल्याने लवकर आटोक्यात आली आहे.

यावेळी कार्यक्रमाला आमदार सुधाकर कोहळे , कृष्णा खोपडे , सुधाकर देशमुख , खासदार विकास महात्मे उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. विजपुरवठा खंडित झाल्याने सभागृहाच्या खालीच अंधारात उर्वरित पदग्रहण कार्यक्रम उरकण्यात आला आहे.

Intro:नागपूरातील भभारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात एम सी बी ला मध्ये सॉर्ट सर्किट झाल्याने कार्यक्रमादरम्यान तारांबळ उडाली होती....घटनेचे गंभीर समाजताच सतर्कता म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना उतरविण्यात आलं खाली होत....आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन विभागाची एक गाडी घटना स्थळी दाखल झाली होती...आग किरकोळ असल्याने लवकर आटोक्यात आली आहे Body:आज नवनियुक्त शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांचा पदग्रहान समारोह सुरू होता...कार्यक्रमावेळी चार आमदार आणि एक खासदार सुद्धा होते उपस्थित.... नागपूरच्या भाजप कार्यालयात यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी कार्यालयाच्या सभागृहात जमली होती....भाषण सुरू असताना हॉल मध्ये असलेल्या एमसीबी मध्ये शॉर्ट सर्किट मुळे ठिणगी उडाली आणि धूर निघायला सुरवात झाली,ज्यामुळे कार्यक्रते घाबरले आणि तारांबळ उडायला सुरवात झाली.... मात्र सतर्कता बाळगत आग विझवण्याऱ्या सिलेंडरच्या साहाय्याने आग विजविण्यात आली....मात्र काही वेळा साठी कार्यकर्त्यां मध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं होतं .. यावेळी कार्यक्रमाला आमदार सुधाकर कोहळे , कृष्णा खोपडे , सुधाकर देशमुख , खासदार विकास महात्मे उपस्थित होते . कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवत मोठी दुर्घटना होता होता वाचली आणि उर्वरित कार्यक्रम मग बिल्डिंग च्या खाली उरकण्यात आला Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.