ETV Bharat / state

नागपुरात मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई - नागपुरात नागरिकांकडून दंडवसुली

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोधपथकाचे कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध सातत्याने कारवाई करत आहेत. मात्र अशा लोकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र नागपुरात दिसत आहे. एवढंच नाही तर, दंडाची रक्कम दोनशेवरून पाचशे करण्यात आल्यानंतर देखील घराबाहेर पडल्यानंतर मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

nagpur corona news
नागपूरात मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई
author img

By

Published : Oct 26, 2020, 11:52 AM IST

नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोधपथकाचे कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध सातत्याने कारवाई करत आहेत. मात्र अशा लोकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र नागपुरात दिसत आहे. एवढंच नाही तर, दंडाची रक्कम दोनशेवरून पाचशे करण्यात आल्यानंतर देखील घराबाहेर पडल्यानंतर मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे; तसेच मृतांची संख्यादेखील वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोधपथक दररोज दहा झोनमधील मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई करत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इत्यादी सूचना नागपूर मनपाद्वारे नागपुरकरांना वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापरणाऱ्या नागारिकांना वचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबरपासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीदेखील नागरिक मास्कशिवाय फिरत आहेत. आतापर्यंत लक्ष्मीनगर झोनअंतर्गत २२०७, धरमपेठ झोनअंतर्गत २८००, हनुमाननगर झोनअंतर्गत १३९६, धंतोली झोनअंतर्गत ११९६, नेहरुनगर झोनअंतर्गत ७८१, गांधीबाग झोनअंतर्गत ९३८, सतरंजीपूरा झोनअंतर्गत ९३९, लकडगंज झोनअंतर्गत ८०८, आशीनगर झोनअंतर्गत १४६७, मंगळवारी झोनअंतर्गत १५६९ आणि मनपा मुख्यालयात १४२ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली. आतापर्यंत एकूण मास्क न लावणाऱ्या १४२४३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत ५५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.