ETV Bharat / state

विवाहितेच्या वडिलांचा दिराकडून खून, मुलीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप - नागपूर हुडकेश्वर क्राईम न्यूज

'मृत व्यक्तीचे आपल्या पोटच्या मुलीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. लग्नानंतर मुलगी नागपूरला आल्यानंतर वडीलदेखील नागपूरला राहायला लागले होते. यादरम्यान त्यांनी पुन्हा मुलीसोबत अवैध संबध ठेवायला सुरुवात केली,' असा आरोप मुलीच्या सासरच्यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

विवाहितेच्या वडिलांचा दिराकडून खून
विवाहितेच्या वडिलांचा दिराकडून खून
author img

By

Published : Jan 19, 2021, 1:23 PM IST

Updated : Jan 19, 2021, 1:43 PM IST

नागपूर - विवाहित मुलीच्या वडिलांचा तिच्या सासरच्यांकडून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. धक्कादायक म्हणजे मृत व्यक्तीचे त्याच्या स्वतःच्या मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचे सासरच्यांकडून सांगण्यात आले. बाप-लेकीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी लाजिरवाणी घटना उजेडात आल्याने दिराने मित्रांच्या मदतीने मुलीच्या बापाची हत्या केल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

विवाहितेच्या वडिलांचा दिराकडून खून

'मृत व्यक्तीचे आपल्या पोटच्या मुलीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. लग्नानंतर मुलगी नागपूरला आल्यानंतर वडीलदेखील नागपूरला राहायला लागले होते. यादरम्यान त्यांनी पुन्हा मुलीसोबत अवैध संबध ठेवायला सुरुवात केली,' असा आरोप मुलीच्या सासरच्यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून टीव्ही अभिनेत्रीवर बलात्कार, वैमानिकाविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेली माहिती

मृत व्यक्ती मूळची उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथील रहिवासी होती. 'मृत व्यक्ती मुलीचे वडील असल्याने सासरच्या परिवारातील लोकांना सुरुवातीला या पवित्र नात्यावर संशय आला नाही. मात्र, एकदा आक्षेपार्ह स्थितीत मुलगी आणि वडील दिसल्यानंतर घरच्यांचा संशय बळावला होता. त्यानंतर मुलीच्या दिराने आणि मित्रांनी मुलीच्या वडिलांवर पाळत ठेवायला सुरवात केली होती. काल ही व्यक्ती चुकीचे कृत्य करण्याच्या प्रयत्नात आढळताच आरोपी दिरासह चौघांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले,' असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समजले आहे.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यातील दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

आरोपांची सत्यता पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न

या खून प्रकरणामागे ज्या पद्धतीचे घृणास्पद कारण दिले जात आहे, त्या संदर्भात हुडकेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अनेक प्रकारच्या संशयाला वाव असल्याने पोलिसांनी मृताच्या कुटुंबातील लोकांना या संदर्भात सूचना दिलेली असून त्यांची देखील चौकशी केली जाण्याची दाट शक्यता आहे. शिवाय पळून गेलेल्या दोन आरोपींना अटक झाल्यानंतर उर्वरित सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.

मृताच्या मुलीच्या मनावर मानसिक आघात

वडिलांचा खून झाल्यानंतरदेखील मुलगी कित्येक तास वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून होती. नंतर लोकांनी तिला तुझे वडील आता या जगात नाहीत, हे सांगितल्यानंतर तिने हंबरडा फोडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

हेही वाचा - खासगी रुग्णालयाच्या आवरात खून करणाऱ्या मारेकऱ्यांना २४ तासांत अटक

Last Updated : Jan 19, 2021, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.