नागपूर - भारतात कापसाच्या गाठींची आयात वाढली आहे. जगातील बाजारपेठेत मंदीचे वातावरण असताना देखील स्वतंत्र भारताच्या इतिहासाच्या 70 वर्षात आतापर्यंतची सगळ्यात मोठी कापसाच्या गाठींची आयात झाली आहे. यावरून लक्षात येते आहे कि, देशातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची क्रयशक्ती टिकवायची असेल तर कापूस उत्पादकांना प्रति क्विंटल 1 हजार रुपये बोनस जाहीर करण्याची विनंती शेतकरी नेते जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली.
हेही वाचा - वर्ध्यात जोरदार पाऊस; पीकाच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 30 लाख कापूस गाठींची विक्रमी आयात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादकांच्या आर्थिक हितांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार काही उपाय योजना करत नसेल तर भविष्यात मोठी अडचण निमार्ण होणार आहे. कार आणि दुचाकींची विक्री घटल्यामुळे आपल्या देशात आर्थिक मंदी आल्याचे बोलले जात आहे. कार निर्मितीच्या उद्योगांवर संकट असल्याने अनेकांचे रोजगार गेले असल्याची चर्चा जोरात सुरु असताना कोट्यवधी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रयशक्ती कमी होते आहे. ज्यामुळे देशाच्या जिडीपीवर परिणाम होत असताना शेतकऱ्यांसंदर्भात हे सरकार काही चांगले निर्णय घेणार आहे का? असा प्रश्न शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे अदानी, अंबानीच्या घशात ; नाना पटोलेंचा घणाघात
कापसाचे उत्पादन वाढले असताना देखील देशातील सूतगिरण्या बंद होत आहे. सरकार कापसाला 5550 रुपये मूल्य देणार आहे. मात्र, व्यापारी त्या भावात खरेदी करणार नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. जर आपल्या देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवायची असेल तर त्यांना प्रति क्विंटल 1 हजार रुपये बोनस जाहीर देण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
हेही वाचा - हातातोंडाशी आलेल्या कोथिंबीरीच्या शेतावर फिरवला ट्रॅक्टर...