ETV Bharat / state

तोतया पोलिसाला नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या - चंद्रपूर जिल्ह्यातला

शहरातील लोकांकडून पैशाची वसुली करणाऱ्या तोतया पोलिसाचा खऱ्या पोलिसांनी पर्दाफाश  केला आहे. दिलीप टापरे असे अटकेत असलेल्या बोगस पोलिसाचे नाव आहे.

जेरबंद केलेल्या तोतया पोलिसबद्दल माहिती देतांना भानुदास पिदूरकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, लकडगंज
author img

By

Published : Jun 29, 2019, 4:38 PM IST

नागपूर- शहरातील लोकांकडून पैशाची वसुली करणाऱ्या तोतया पोलिसाचा खऱ्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिलीप टापरे असे अटकेत असलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो तोतया पोलीस बनून लोकांकडून पैसे वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जेरबंद केलेल्या तोतया पोलिसबद्दल माहिती देतांना भानुदास पिदूरकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, लकडगंज

गेल्या तीन-चार वर्षांपासून तो पोलिसाच्या वर्दीचा धाक दाखवून लोकांकडून आत्मविश्वासाने अवैद्यपणे पैसे उकळायचा. पोलिसांनी देखील दिलीपला खरा पोलीस समजून दुर्लक्ष केले होते. मात्र, नुकताच लकडगंज येथील गंगाजमूना परिसरात तो पैशासाठी हुज्जत घालताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी दिलीपला विचारणा केली, मात्र त्यादरम्यान दिलीपच्या वर्दीवर नेमप्लेट दिसली नसल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर लकडगंज पोलिसांनी तुरंत दिलीप टापरे याला बेड्या ठोकल्या.

दिलीप मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातला असून, नागपूरात गाडगेबाबानगर परिसरात राहतो. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी बोगस ओळखपत्र, २६०० रुपये रोख आणि दुचाकी जप्त केली आहे. लकडगंज पोलीस स्टेशनचे एएसआय कणकदळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १७०, १७१ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना उघडकिस आल्यानंतर शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Intro:नागपूर

पोलीसाच्या गणवेशात लोकांकडून पैसे उकाडायचा

वसुली करणाऱ्या तोतया वाहतूक पोलीसाला अटक

नागपूरातच लोकांकडून पैशाची वसुली करणाऱ्या तोतया पोलीसाचा पर्दाफाश खऱ्या पोलिसांनी केलीय. दिलीप टापरे असं अटकेत असलेल्या बोगस पोलीसाचं नाव असून, गेल्या अनेक वर्षांपासून तो बोगस पोलीस म्हणून लोकांकडून पैसे वसूल करत होता अशी धक्कादायक माहिती आता पुढे आलीयBody:चेहऱ्यावर कपडा बांधून पोलीसांच्या तावडीत असलेला हा आहे दिलीप टापरे.गेल्या तीन-चार वर्षांपासून तो पोलस वर्दी चा धाक दाखवून लोकांकडून अवैद्यपणे ल पैसे उकाडायचा ते ही मोठ्या आत्मविश्वासाने. पोलिसांनी देखील दिलीप ला खरा पोलीस समजू दुर्लक्ष केले मात्र नुकताच लकडगंज येथील गंगाजमूना परिसरात तो पैश्या साठी हुज्जत घालताना पोलिसांना दिसले. पोलसींनी विचारणा केली मात्र दिलप च्य वर्दी वर नेम प्लेट दिसली नाही पोलिसांना संशय आला आणि लकडगंज पोलिसांनी दिलीप टापरे ह्याला बेड्या ठोकल्या.Conclusion:दिलीप मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील असून, नागपूरात गाडगेबाबानगर परिसरात राहतो. त्याला अटक केल्यानंतर आरोपी दिलीप याच्याकडून पोलिसांनी बोगस ओळखपत्र, रोख २६०० रुपये आणि दुचाकी जप्त केलीय.
आणि लकडगंज पोलीस स्टेशनचे एएसआय कणकदळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १७०, १७१ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय. पण नागपूर सारख्या शहरात बोगस पोलीसाच्या या वसूलीनं सर्वत्र खळबळ उडालीय.

बाईट - भानुदास पिदूरकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, लकडगंज
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.