ETV Bharat / state

Devendra Fadnavis : आमच्या सरकारच्या कामाची गती बघून विरोधकांमध्ये प्रचंड अस्वस्थता - फडणवीस - lot of disquiet among opposition

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ( Maha Vikas Aghadi Govt) काळात कार्यशून्य कारभारावर जोरदार टीका ( Strong criticism of dysfunctional governance ) केली आहे. तर सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी दिले.

Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 20, 2022, 8:19 AM IST

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या ( Bharatiya Janata Party ) प्रदेश कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक नागपूरच्या एका हॉटेल मध्ये पार पडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister of state Devendra Fadnavis ) महाविकास आघाडीच्या काळात कार्यशून्य कारभारावर जोरदार टीका ( Strong criticism of dysfunctional governance ) केली आहे. महाविकास आघाडी सरकारला झालेला निर्णय-लकवा आपण संपविला. निर्णय न घेणे, हाच महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय होता अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी दिले. मराठा समाजाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे उत्तर देत होते.

शिंदे सरकारचे धडाडीने काम : महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात शेतकरी आणि कोणत्याही घटकाला महाविकास आघाडीने मदत त्यांनी केली नाही. मात्र आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आतापर्यंत 7 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली असल्याचे ते म्हणाले आहेत. अतिशय धडाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार काम करते आहे, ती स्पीड कुणालाही मॅच करता येत नाही आहे, म्हणून विरोधक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात वाटचाल करीत आहे. सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री ही सेवेची संधी मला मिळाली. मला मिळालेली संधी ही सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. आपला माणूस म्हणून लोक माझ्याकडे बघतात. राज्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यामुळे आमचे सरकार हे सामान्यांच्या मनातले सरकार आहे,असे त्यांनी सांगितले.

म्हणून जनता मोर्चात सहभागी झाली नाही : वारकरी परंपरा महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला डिचविण्याचा नाही तर खिल्ल्ली उडविण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच सामान्य जनता मोर्चात आली नाही आणि नॅनो मोर्चा झाला. पैसे वाटतानाचे व्हिडिओ आले, कोण कशासाठी आले, हे ठावूक नसलेला व्हिडिओ पाहिला.

प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना असली पाहिजे : आपली लढाई विरोधकांशी नाही, आपल्याशी लढण्याचा त्यांच्यात दमच नाही. आपली लढाई नरेटिव्हशी आहे. आपल्या सरकारला यशस्वी करायचे आणि त्यासाठी सर्वस्व झोकून द्यायचे आहे, ही पुढच्या काळात प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना असली पाहिजे.

जगात मंदी, भारताची मात्र प्रगती : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा लौकिक वाढतो, तेव्हा तो संपूर्ण भारताचा गौरव असतो. प्रत्येक भारतीयाचा गौरव असतो. जग अजूनही मंदीचा सामना करीत असताना भारत मात्र वाढीच्या दिशेने निघाला आहे.

एक हजार कोटी दिले : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध घटकांच्या शिष्यवृत्ती थांबल्या होत्या. आपले सरकार आल्यावर 1 हजर कोटी DBT तून रिलीज केले. सभागृहात मी सगळे आकडे देणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी : मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी शासनाने अनेक योजना सुरु केल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी शासन सज्ज आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कर्ज योजना, तसेच शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आल्या असून विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहाय्य करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा तरुण नोकरी देणारा व्हावा- उपमुख्यमंत्री फडणवीस : मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांद्वारे भांडवल दिले जात आहे. मराठा युवकांचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक असून अनेकांचे उद्योग यशस्वीरित्या सुरु आहेत. मराठा समाजातील तरुण हा नोकरी देणारा व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मी तुमचा वकील म्हणून काम करण्यास तयार : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकीकडे शासन कायदेशीर लढाई लढत आहे. सोबतच उद्योजकतेला वाव देणाऱ्या योजना, वसतीगृह योजना, निर्वाह भत्ता योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून मराठा युवक युवतींना न्याय देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. मराठा समाजाच्यावतीने 12 मागण्यांचे निवेदन राजे डॉ. मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मी नागपूरकर या नात्याने तुमचा वकील म्हणून काम करायला तयार आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.