नागपूर Criminal Raju Birha : तीन मित्रांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या राजू बिराहची (Criminal Raju Birha) फाशी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द करत, ३० वर्ष जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तिहेरी हत्याकांड २०१५ (Tripple Murder Case) साली नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात गुमगाव जवळ घडली होती. वृंदावन सिटीच्या मुख्य गेटसमोर आरोपी राजू बिराहा याने सुनील कोटांगळे, कैलाश बहादुरे व आशिष गायकवाड या तिघांची सत्तूर सारख्या तीक्ष्ण हत्याराने हत्या केली होती.
त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं : १७ नोव्हेंबर २०१५ ला तिहेरी हत्याकांड घडले होते. गुमगाव जवळी वाघदरा शिवारात सुनील कोटांगळे,आशिष उर्फ गोलू गायकवाड आणि कैलाश बहादुरे हे तिघे वृंदावन सिटी समोरच्या समोरचं असलेल्या टपरीवर बसले असताना राजू बिराहा त्या ठिकाणी आला. राजू बिराहचा त्याच ठिकाणी असल्याने तो तिथेच आपले काम करत असताना तिघांचा राजू बिराहासोबत वाद झाला. पानठेला लावण्याच्या जागेवरून चौघांमध्ये जुना वाद होता, तो पुन्हा भडकला. सुरूवातीला बाचाबाची वरून सुरु झालेल्या वादाने अचानक हिंसक वळण घेतले असता, आरोपी राजू बिरहने तिघांवर हल्ला केला. अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्यामुळे सुनील कोटांगळे,आशिष उर्फ गोलू गायकवाड आणि कैलाश बहादुरे जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी आरोपीने मित्राच्या मदतीने तिघांचा पाठलाग करत तिघांचीही निर्गुण हत्या केली.
शांत डोक्याने केली हत्या : आरोपीने सर्वांची हत्या अतिशय शांत डोक्याने केली. धक्कादायक बाब म्हणजे तिघांची हत्या केल्यानंतर आरोपी राजू बिरह स्वतःच्या घरी गेला आणि तिथून हिंगणा पोलिसांनी फोन करत तिघांची हत्या केल्याची माहिती दिली. सुरूवातीला आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सुनील कोटांगळे ,आशिष उर्फ गोलू गायकवाड आणि कैलाश बहादुरे तिघांचेही मृतदेह दिसले. राजू बिरहा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता, त्याच्या विरुद्ध याआधी सुद्धा अनेक गुन्ह्याची नोंद आहे.
हेही वाचा -