ETV Bharat / state

Nagpur Crime : बेपत्ता तीन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती - Nagpur Crime

नागपुरात एका कारमध्ये तीन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही तीन मुले काल खेळत असताना बेपत्ता झाली होती. नागपुरातील फारुख नगरमध्ये तीनही मुलांचे मृतदेह एका कारमध्ये आज सापडले आहेत. तौफिक फिरोज खान (४ वर्ष), आलिया फिरोज खान (६ वर्ष) आणि आफरीन इरशाद खान (६ वर्ष) अशी तिघांची नावे आहेत. या प्रकरणी वेगवेगळे तर्क-विर्तक वर्तवण्यात येत आहेत.

Nagpur Crime
Nagpur Crime
author img

By

Published : Jun 18, 2023, 10:06 PM IST

नागपूर : नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फारुख नगर येथून कालपासून बेपत्ता झालेल्या तीनही मुलांचे मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून त्या भागात तणाव निर्माण झाला आहे. तौफिक फिरोज खान (४ वर्ष), आलिया फिरोज खान (६ वर्ष) आणि आफरीन इरशाद खान (६ वर्ष) हे तीन मुले कालपासून बेपत्ता झाले होते. पोलिसांनी गेल्या २४ तासात या मुलांना शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, आज संध्याकाळी तीनही मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत.

तौफिक, आलिया आफरीन बेपत्ता : तीन मुले कालपासून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून पोलिसांनी संपूर्ण परिसरात त्यांचा शोध घेतला. पोलिसांनी हजारो सीसीटीव्हीही तपासले मात्र, बेपत्ता मुलांचा कुठेही पत्ता नाही लागला. काल रात्रभरापासून शेकडो पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्यांचा शोध घेत होते. फारूक नगर परिसरात अनेक कारखाने आहेत. त्या ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, आज संध्याकाळी मुलांच्या घराजवळच्या एका भंगाराच्या गाडीत तिघांचे मृतदेह आढळली आहेत. पोलिसांनी तीनही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवले असून या मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

परिसरात तणाव : तीन मुलांचे मृतदेह आढल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. परिसरातील लोकांमध्ये रोष असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला आहे. काल दुपारच्या सुमारास टेका नाका परिसरातील फारुख नगर मैदानावर मुले खेळण्यासाठी गेली होती. त्यानंतर ता गायब झाली होती. रात्र होऊनही मुले परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले.

घातपात झाल्याचा संशय : पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. आज नागपूरच्या फारुख नगरमध्ये एका कारमध्ये तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. मोठी घातपात झाल्याचा संशय नागपूर पोलिसांना आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत. कालच नागपूर पोलिसांनी रेल्वे स्थानकातून मुलाला पळवून नेणाऱ्या चोरट्याला अटक केली. तो मध्य प्रदेशातील होता. ते प्रकरण ताजे असतानाच आज तीन मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.