नागपूर - स्पाईस जेटच्या बंगळुरू-दिल्ली विमानाचे काही तांत्रिक कारणामुळे नागपुरात रात्री दीड वाजता इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तेव्हापासून सुमारे दीडशे प्रवासी नागपूर विमानतळावर अडकून आहेत.
स्पाईस जेटच्या बंगळुरू ते दिल्ली विमानाने उड्डाण भरल्यानंतर त्यात काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे हे विमान नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री दीडच्या सुमारास उतरवण्यात आले. यावेळी विमानात दीडशे प्रवाशी प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला पोहचवण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, प्रवाशांच्या पुढील प्रवासाची अद्याप कोणतीही सोय झाली नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
नागपूर विमानतळावर मुंबईतून पर्यायी विमान आणि इंजिनियर्स येतील असे प्रवाशांना सांगितले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा बंगळुरू वरून विमान येईल, असे सांगितले. मात्र, अद्याप पर्यंत विमान न आल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.