ETV Bharat / state

Death Due To Electric Shock: टीव्ही सुरू करताना विजेचा धक्का लागल्याने ४ वर्षीय मुलाचा मृत्यू

लहान मुलांना विद्युत उपकरणांचे जास्त आकर्षण असते. ते नेहमी विजेवर चालणाऱ्या उपकरणांशी खेळण्याचा, त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा यामुळे अनर्थ देखील घडतो. त्यामुळे पालकांनी त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. अशीच एक घटना नागपूरमधून समोर आली आहे. टीव्ही सुरू करताना विजेचा धक्का लागल्याने ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Death Due To Electric Shock
विजेचा धक्का लागून चिमुकल्याचा मृत्यू
author img

By

Published : Aug 9, 2023, 11:33 AM IST

नागपूर : घरातील टीव्ही सुरू करताना सेट टॉप बॉक्सला स्पर्श झाल्यानंतर विजेचा धक्का लागल्याने ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील खैरी पन्नासे या गावात मंगळवारी दुपारी घडली आहे. प्रियांशु ज्ञानेश्वर चव्हारे असे या चिमुकल्याचे नाव आहे. हिंगणा पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

'अशी' घडली घटना : प्रियांशु घरी खेळत असताना त्याने टीव्ही सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टीव्ही सुरू करताना प्रियांशुचा स्पर्श सेट टॉप बॉक्सला झाला. त्याचवेळी सेट टॉप बॉक्समध्ये विद्युत प्रवाह आल्याने त्याचा झटका बसून प्रियांशु जागेवरच खाली पडला. घरच्या लोकांनी त्याला तात्काळ हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. हिंगणा पोलिसांनी प्रियांशुंचे वडील ज्ञानेश्वर चव्हारे यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात झाली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला.

क्षणात अनर्थ घडला : ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा प्रियांशुचे वडील शेतातून काम आटपून घरी आले होते. ते आराम करत होते. आई, आजी आणि आजोबा हे मजुरीला गेले होते. प्रियांशु हा घरात खेळत होता. टीव्ही सुरु करताना त्याचा हात सेट टॉप बॉक्सला लागला. तांत्रिक बिघाडामुळे बॉक्समध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित झाला, त्याला विजेचा धक्का बसला. या घटनेमुळे चव्हारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लहान बालकांच्या अपघाताच्या घटना : लहान बालकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण पालकांचे दुर्लक्ष झाल्यामुळे बालकांचे अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. मार्चमध्ये सातारा जिल्ह्यात देखील अशीच घटना घडली होती. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे पाच वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर नागपूरमध्ये देखील माळ्यावरून पडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली होती. माळ्यावर हा चिमुकला खेळत होता. खेळताना तो पाचव्या मजल्यावरून पडला होता.

हेही वाचा :

  1. VIDEO : लोणावळ्यात दोन वर्षीय चिमुकल्याचा स्विमिंग पुलात बुडून मृत्यू
  2. वाढदिवसच ठरला अखेरचा दिवस; दुचाकीस्वाराच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू
  3. Boy Killed in Dog Attack : कराडमधील तीन वर्षांच्या चिमुरड्याचा श्वानांच्या हल्ल्यात मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.