ETV Bharat / state

Nagpur ZP School : नागपूर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा; सत्ताधाऱ्यांनो सांगा, विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे?

राज्यात जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था ही कुणापासूनही लपलेली नाही. देशात इंग्रजी शाळांचे जाळे वेगाने विस्तारित होत आहेत. याउलट इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये गरीब मुलांना ऍडमिशन मिळत नसल्याचे वास्तव सर्वांसमोर आहे. नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या चांगली आहे, त्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याचे गंभीर चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

Nagpur Zilla Parishad Schools
नागपूर जिल्हा परिषद
author img

By

Published : Aug 4, 2023, 9:50 PM IST

शिक्षकांच्या कमतरतेविषयी नागपूर जि.प.च्या उप शिक्षणाधिकाऱ्याची प्रतिक्रिया

नागपूर : जिल्ह्याच्या १३ तालुक्यातील १५१५ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तब्बल ७३० शिक्षकांचे पद रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या एकूण ७२ हजार ६६१ इतकी असताना, मात्र ३७६० शिक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात अशा ४२ शाळा आहेत, ज्या केवळ एका शिक्षकाच्या भरवशावर सुरू आहेत.

शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची फजिती : शाळेत विद्यार्थी नाहीत म्हणून शाळा बंद पडत आहेत, अशा बातम्या नेहमीच वाचनात येतात. परंतु, विद्यार्थी असताना शिक्षकाविना शाळा ओस पडल्याने विद्यार्थ्यांना चक्क शंभर किलोमीटरचा प्रवास करून थेट जिल्हा परिषद गाठावी लागल्याची घटना गेल्याच आठवड्यात नागपुरात घडली होती. नागपूर जिल्ह्यात असलेल्या काटोल तालुक्यात मलकापूर हे गाव आहे. गावात प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या १५ इतकी असून, पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरवले जातात. मात्र, नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर शाळेत शिक्षकच नाही, म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. ही दयनीय परिस्थिती केवळ नागपूर जिल्ह्यातील एका शाळेची नाही तर संपूर्ण शाळांची झाली आहे.

तालुकानिहाय शिक्षकांची रिक्त पदे : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात १०३ शाळा असून २८ पदे रिक्त आहेत. हिंगणा तालुक्यात १२३ शाळा आहेत. इथेही तब्बल ८३ शिक्षकांची कमतरता आहे. कळमेश्वर तालुक्यात ८६ शाळा कार्यरत आहेत. जिथे ३५६२ विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी इथेही ३९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. याशिवाय कामठी तालुक्यात ७७ शाळा अस्तित्वात आहेत. या शाळांमध्ये ६१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे काटोल येथे ६१, कुही तालुक्यात ६५, मौदा तालुक्यात ७२, नागपूर ग्रामीणमध्ये ६१, नरखेड तालुक्यात ६३, पारशिवानी तालुक्यात ७७, रामटेक तालुक्यात ३६, सावनेर तालुक्यात ३८ आणि उमरेड ४५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या : गेल्या काही वर्षांपासून नवीन शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेलीच नाही. तर दुसरीकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ७३० शिक्षकांचे पद हे रिक्त झालेली आहेत. २०१८ या वर्षात १४३ शिक्षक निवृत्त झाले आहेत. तर २०१९ साली हा आकडा १८१ इतका होता. २०२० मध्ये २०५ शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. २०२१ साली २३७ तर २०२२ मध्ये २३६ शिक्षक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

हेही वाचा:

  1. Students Movement In ZP : कोणी शिक्षक देता का शिक्षक? शेकडो विद्यार्थी धडकले माटरगाव बुद्रुक जिल्हा परिषदेवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.