नागपूर Vijay Wadettiwar : महायुती सरकारनं कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द केल्याचं आज जाहीर केलं. यामुळं राज्यातील युवकांच्या लढ्याला मोठं यश आलंय. चुकीच्या धोरणांमुळं कंत्राटी भरतीचा शासन निर्णय (जीआर) रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आलीय. काही कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी हा निर्णय कंत्राटी सरकारनं घेतला होता असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. राज्य शासनाने कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज नागपुरात बोलत होते.
..म्हणून विरोधकांवर बिनबुडाचे आरोप : विजय वडेट्टीवार म्हणाले, काही नेत्यांना कंत्राटी भरतीतून फायदा होणार होता. त्यामुळं सरकानं हा निर्णय घेतला होता. विरोधकांनी केलेल्या विरोधामुळं सरकरानं भरतीचा निर्णय रद्द केलया. मात्र सरकार आता विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करत आहे. कंत्राटी भरती फक्त वर्ग क, वर्ग ड जागांसाठी करण्यात यावी, असा आघाडी सरकारचा निर्णय होता. मात्र सध्याचे सरकार हे तहसीलदारा सारखी महत्वाची पदे कंत्राटावर भरणार होतं. आघाडी सरकारनं पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी कंत्राटी भरतीचा पर्याय वापरला नव्हता, असा दावा देखील त्यांनी केलाय.
कंत्राटी सरकार नोकऱ्या संपवू पाहतय : ज्या विभागांना शक्य आहे, त्यांनी वर्ग क, 'ड'ची भरती कंत्राटी माध्यमातून करावी. जिथे गरज आहे, तिथं पद निर्मिती करा, असा शासन निर्णय आमच्या काळात झाला होता. त्यात अतिकुशल,अर्ध कुशल, अकुशल अशा सर्वच पदांना कंत्राटी पदभरती सक्तीची करून कंत्राटी सरकार नोकऱ्या संपवू पाहत आहे. यामुळं आरक्षण, शासकीय नोकऱ्या दोन्हीही संकल्पना संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव आहे. हा डाव युवकांनी हाणून पाडला अशा शब्दात वडेट्टीवार यांनी टीका केली.
आत्मपरिक्षण करण्याची गरज : महाविकास आघाडी सरकारमधून कंत्राटी सरकारमध्ये सामील झालेले मंत्री आज टिका करताना दिसत आहेत. आज टिका करणारे, तेव्हा काय करत होते. त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. ही लढाई अजून थांबली नाही. स्पर्धा परीक्षामधील पेपरफुटी, परीक्षार्थींकडून घेण्यात आलेलं परीक्षा शुल्क, भरतीचा कालबध्द कार्यक्रम, अशा अनेक मुद्यांवर आम्ही लढत राहणार, राज्यातील युवक-युवतींना न्याय मिळवून देणार असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
- Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जम्मू-काश्मीरला रवाना, मराठा रेजिमेंटची स्फूर्ती वाढणार
- Manoj Jarange Patil Sabha Video : 'मराठा समाजाच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार; इंचभर मागं हटणार नाही'
- MLA Disqualification Case : याचिका सहा गटात एकत्रित करुन सुनावणी होणार- विधानसभा अध्यक्ष