नागपूर - विदर्भाचे आराध्या दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिर सूर्यग्रहण काळात बंद करण्यात आले होते. तब्बल 18 तास बाप्पाचे दर्शन बंद करण्यात आल्यानंतर भाविकांसाठी मंदीर खुले करण्यात आले आहे.
हेही वाचा - जगात सर्वात स्वस्त डाटाचे दर असलेल्या दूरसंचार क्षेत्रावर आहे 'हे' संकट
सूर्यग्रहण काळात संपूर्ण भारतातील मंदिरांचे दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिराचे द्वारसुद्धा बुधवारी संध्याकाळी 5 वाजता बंद करण्यात आले. गुरुवारी 11 वाजून 20 मिनिटांनी ग्रहण काळ संपल्यानंतर विधीवत पूजा करून बाप्पाची आरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांसाठी बाप्पाचे मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आले.
हेही वाचा - जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांपैकी सहा भारतातील!