नागपूर - महानगर पालिकाच्यावतीने ड्राइव इन वैक्सिनशन केंद्रात आजपासून (मंगळवारी) ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण केल्या जाणार आहे. या नागरिकांना कोव्हिशिल्ड लस दिल्या जाणार आहे. लसीकरणाची वाढती मागणी पाहता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी हा निर्णय घेतला.
शहरातील सर्व केंद्रांवर लसीकरण -
सध्या ग्लोकल स्क्वायर मॉल सीताबर्डी आणि वी आर नागपुर मॉल येथे ६० वर्षांवरील नागरिकांचे ड्राइव इन वैक्सीनशन मोहिमेअंतर्गत लसिकरण सुरू आहे. राज्य शासनाने ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना दोन्ही डोस देण्यासाठी लस उपलब्ध करुन दिली आहे. मंगळवारी मनपाच्या सर्व केन्द्रांवर लसीकरण केल्या जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाइन वर्कर यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व. प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा फक्त दुसरा डोस उपलब्ध आहे.
राज्य शासनाचे निर्देशानुसार सध्या १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. केंद्र शासनाच्या नविन निर्देशानुसार आता कोव्हिशिल्डचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्याच्या आत नागरिकांना द्यायचा आहे, म्हणून नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच ज्या नागरिकांना कोव्हीशिल्डचा पहिला डोस १२ आठवड्यापूर्वी घेतला त्यांना दुसरा डोस दिला जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - नागपूर गुन्हे शाखा पोलिसांची मोठी कारवाई; एकाच वेळी ८६ ठिकाणी छापेमारी