ETV Bharat / state

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संघटन मजबूत करा - डॉ. नितीन राऊत - काँग्रेस अनुसूचित जाती विभाग राष्ट्रीय महासचिव व राज्य प्रभारींची बैठक

डॉ. राऊत यांनी कोरोना काळात अनुसूचित विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

डॉ. नितीन राऊत
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संघटन मजबूत करा - डॉ. नितीन राऊत
author img

By

Published : May 30, 2021, 7:56 PM IST

नागपूर - येत्या काही महिन्यात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी राज्यातील काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकार्यांनी संघटन मजबूत करावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. ते नागपूरात आभासी पद्धतीने अ. भा. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय महासचिव व राज्याच्या प्रभारींच्या बैठकीत सहभागी होते. यावेळी अध्यक्षस्थानी अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत होते. यावेळी बोलताना डॉ. राऊत यांनी कोरोना काळात अनुसूचित विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तेलंगणा राज्याच्या पदाधिकार्यांनी रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करून रुग्णांना वेळीच मदत केल्याबद्दल तेलंगाणा राज्याचे अध्यक्ष प्रितम नगारीगारी यांच्या कामाचे अभिनंदन केले.

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी
अनुसूचित जाती विभागाने नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तामीळनाडू राज्यात अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष असलेल्या सेलवापुरूनथलाई यांची तामीळनाडू विधानसभा नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी डॉ. राऊत यांनी विविध राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकींच्या निकालाचाही आढावा या संवादाच्या माध्यमातून घेतला.

येत्या काही महिन्यात ८ राज्यांमध्ये निवडणुका होणार
येत्या काही महिन्यात ८ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. या राज्यांमध्ये सुद्धा अनुसूचित जातीच्या विभागाला मोठी भूमिका बजावावी लागणार आहे. राष्ट्रीय पातळीवर अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकार्यांची काँग्रेस हायकमांडकडून दखल घेतली जात आहे. यामुळे हरियाणा येथील प्रदीप नरवाल यांची अ. भा. काँग्रेस समिताच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणूनही त्यांची नियुक्ती केली आहे.

अनुसूचित विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक
यावेळी राजस्थान व छत्तीसगड राज्याचे प्रभारी असलेल्या राजाभाऊ करवाडे यांनी राजस्थानचा अहवाल सादर केला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये राजस्थानमधील ३ पैकी २ मतदारसंघात काँग्रेसने विजय संपादन केला तसेच काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही सगण्यात आले. यावेळी गुजरात व मध्य प्रदेश राज्यांचे प्रभारी असलेले अनिल नगरारे यांनी गुजरातमधील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला ८ मतदारसंघांमध्ये मिळालेल्या विजयाचा अहवाल सादर केला. मध्य प्रदेशमध्ये दमोह पोटनिवडणुकीत यश मिळाले आहे. या दोन्ही राज्यांच्या प्रदेश अध्यक्षांनी अनुसूचित विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केल्याचेही त्यांनी सांगितले.

यांची उपस्थिती
या बैठकीचे संचालन अनुसूचित जाती विभागाचे सचिव चंद्रसेन राव यांनी केले तर या बैठकीत राष्ट्रीय समन्वयक रविंद्र दळवी, सुरेश कुमार, गोपाल देनवाल, राजकुमार कटारीया, प्रदीप नरवाल, क्षितीज अड्याळकर, हितेंद्र पिथाडीया, प्रमोद कुमार, श्रीमती पूनम पासवान यांनी तर अनुसूचित जाती विभागाचे राज्य प्रमुख असलेले डॉ. धनेश पटीला (छत्तीसगड), एफ.एच. जक्कापन्नवर (कर्नाटक), के. सेल्वापेरुथगाई (तामीळनाडू), बांकानिधी बेहेरा (ओडीसा), राजेश कुमार (बिहार), अशोक प्रसाद (उत्तर प्रदेश) व राजकुमार (उत्तराखंड) यांनीही आपले विचार व भूमिका मांडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.