ETV Bharat / state

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - नितीन राऊत - नागपूर पालकमंत्री नितीन राऊत

जागतिक दर्जाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर वास्तूचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन येत्या काही महिन्यात करण्याचा मानस असल्याने या बांधकामाला गती देण्यात यावी. तसेच कन्व्हेंशन सेंटरमध्ये कार्यालये सुरु करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांशी सपंर्क साधावा, अशा सूचना नितीन राऊत यांनी यावेळी दिल्या.

Dr. Babasaheb Ambedkar Convention Center Visit convention work in nagpur
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर कामाची पाहणी
author img

By

Published : Jun 6, 2021, 7:48 AM IST

नागपूर - जागतिक दर्जाचे नागपुरातील एक वैभव असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. कामठी येथे सुरू असलेल्या या कामाची पाहणी पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली. यावेळी सेंटरचे काम ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास नेण्याच्या सूचना दिल्या.

Dr. Babasaheb Ambedkar Convention Center Visit convention work in nagpur
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांशी सपंर्क साधा -

जागतिक दर्जाच्या या वास्तूचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन येत्या काही महिन्यात करण्याचा मानस असल्याने या बांधकामाला गती देण्यात यावी. तसेच कन्व्हेंशन सेंटरमध्ये कार्यालये सुरु करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांशी सपंर्क साधावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, नासुप्रच्या अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, प्रकल्प वास्तुशिल्पकार संदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

नियोजनात पार्कींग सुव्यवस्थेवर भर द्यावा -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर हा ११३ कोटींचा प्रकल्प आहे. केवळ उत्तर नागपूरमधील नव्हे तर मध्य भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थासाठी हे उत्कृष्ट केंद्र ठरणार आहे. या केंद्रात बँकिंग, तसेच राष्ट्रीय दर्जाचे रेस्टॉरंट, ऑडिटोरीयम, बिझनेस सेंटर, ग्रंथालय, आर्ट गॅलरी आदी स्थापन करण्यात येणार आहेत. आगामी नियोजनात पार्कींग सुव्यवस्थेवर भर देण्यात यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

जागतिक पर्यावरण दिनी केली वृक्षलागवड -

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुगत नगर येथे ‘अशोक’ वृक्षाचे वृक्षारोपण केले. तसेच कल्पनानगर येथील धम्मप्रिय बौद्ध विहार बगीचा येथेही वृक्षारोपण केले. त्यांनी येथील ग्रीन जीमची पाहणी केली. नगरसेविका नेहा निकोसे तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - अभिनेता संजय दत्तनी नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.